नवी दिल्ली : सध्याच्या घडीला भारताचा सलामीवीर रोहित शर्माचे सर्वत्र कौतुक सुरु आहे. पहिल्यांदाच सलामीला येत रोहितने दोन शतके लगावत सामनावीराचा पुरस्कारही पटकावला. पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाने तर वीरेंद्र सेहवागपेक्षा रोहितच भारी आहे, असे वक्तव्य केले आहे.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला की, " मी सेहवाग आणि रोहित यांच्याबरोबर क्रिकेट खेळलो आहे. माझ्यामते रोहितचे फलंदाजी तंत्र हे सेहवागपेक्षा नक्कीच चांगले आहे. माझ्यामते सेहवागपेक्षा रोहित हा नक्कीच चांगला फलंदाज आहे. या दोघांची तुलना करायची झाली, तर सेहवागपेक्षा मला रोहितच फलंदाज म्हणून उजवा वाटतो."
रोहित शर्माची क्रमवारीत भरारी; दोन शतकांसह कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानीमुंबई : भारताचा सालामीवीर रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन शतके झळाकवली होती. त्याचबरोबर रोहितने या सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही पटकावला होता. पण रोहितने या सामन्यातील धावसंख्येच्या जोरावर एक गोष्ट गाठली आहे. रोहितने या दोन शतकांच्या जोरावर कसोटी क्रमवारीतील कारकिर्दीती़ल सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे.
रोहितचे कसोटी संघात स्थान निश्चित नव्हते. वेस्ट इंडिजमधील कसोटी मालिकेत रोहितला संघात स्थान देण्यात आले नव्हते. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहितला सलामीला खेळण्याची संधी दिली आणि त्याने या संधीचे सोने केले. या सामन्यात दोन्ही डावांत रोहितने शतक झळकावत आपली निवड सार्थ असल्याचे दाखवून दिले.
रोहितने दोन्ही डावांत शतके झळकावत एकूण 303 धावा केल्या. या 303 धावांसह रोहितने कसोटी क्रमवारीत थेट 37 स्थानांची भरारी घेतली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला रोहित हा कसोटी क्रमवारीमध्ये 17 व्या स्थानी पोहोचला आहे.