मोहम्मद नबीने धावा 'चोरल्या' म्हणून रोहित भांडला; राहुल द्रविड मात्र हिटमॅनच्या विरोधात  

भारतीय संघाने बुधवारी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधील आतापर्यंतच्या सर्वात रोमहर्षक विजयांपैकी एकाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 05:33 PM2024-01-18T17:33:13+5:302024-01-18T17:33:35+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma charges towards Mohammad Nabi for stealing byes, has heated argument; India coach Dravid defends Afghanistan star | मोहम्मद नबीने धावा 'चोरल्या' म्हणून रोहित भांडला; राहुल द्रविड मात्र हिटमॅनच्या विरोधात  

मोहम्मद नबीने धावा 'चोरल्या' म्हणून रोहित भांडला; राहुल द्रविड मात्र हिटमॅनच्या विरोधात  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs AFG 3rd T20I ( Marathi News ) : भारतीय संघाने बुधवारी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधील आतापर्यंतच्या सर्वात रोमहर्षक विजयांपैकी एकाची नोंद केली. अफगाणिस्तानच्या संघाने बलाढ्य भारतीय संघाला बंगळुरूत कडवी टक्कर दिली आणि त्यामुळे सामना दोन सुपर ओव्हरमध्ये खेळवला गेला. रोहितने आखलेल्या डावपेचांनी भारताचा विजय पक्का केला. या सामन्यात रोहितचा पारा अनेकदा चढलेला पाहायला मिळाला... फलंदाजी करताना अम्पायरच्या निर्णयावर दोन वेळा रोहित भडकलेला दिसला, तर पहिल्या सुपर ओव्हरमध्ये मोहम्मद नबी ( Mohammad Nabi ) धावा चोरल्याचा आरोप करत तो भांडला. पण, यावेळी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) याने नबीचा बचाव केला.


भारताने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २१२ धावा केल्या. ४ बाद २२ अशा दयनीय अवस्थेत सापडलेल्या भारतीय संघाला रोहित व रिंकू शर्मा या जोडीने सावरले. रोहितने नाबाद १२१ व रिंकूने नाबाद ६९ धावांची खेळी करताना १९० धावांची विक्रमी भागीदारी केली. अफगाणिस्तानकडून त्यांना टफ फाईट मिळाली आणि त्यांनी २० षटकांत ६ बाद २१२ धावा करून सामना बरोबरीत सोडवला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर अफगाणिस्तानला ३ धावा मिळाल्या. मुकेश कुमारने टाकलेला चेंडू टोलावण्यात नबी चुकला अन् तो यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या हाती विसावला. नबी धाव घेण्यासाठी पळाला होता आणि संजूने नॉन स्ट्राईकरच्या दिशेने चेंडू फेकला.


संजूने फेकलेला चेंडू नबीच्या पायाला लागून दुसरीकडे गेला आणि त्यात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी दोन धावा पळून काढल्या. यावरून रोहित व विराटने संताप व्यक्त केला. रोहित सामना सुरू असताना नबीसोबत वाद घालायला गेला.  पण, अम्पायरने काहीच ऐकले नाही आणि अफगाणिस्तानला दोन अतिरिक्त धावा दिल्या.  
 


अफगाणिस्तानने सुपर ओव्हरमध्ये केलेल्या १६ धावांच्या उत्तरात भारतालाही १६ धावाच करता आल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यात भारताने विजयासाठी १२ धावांचे लक्ष्य ठेवले, परंतु अफगाणिस्तानला तीन चेंडूंत रवी बिश्नोईने दोन धक्के देत मॅच जिंकली. पण, नबी आणि रोहित यांच्यातला वाद चर्चेत राहिलाच. खिलाडूवृत्तीच्या विषयावरून ही चर्चा रंगली आणि जंटलमन राहुल द्रविडने अफगाणिस्तानच्या सीनियर खेळाडूची बाजू घेतली.

अशा धावा घेण्यापासून तुम्हाला कोणी अडवू शकत नाही - द्रविडने नबीचा केला बचाव

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याला जेव्हा या घटनेबद्दल विचारले गेले, तेव्हा त्याने नबीचा बचाव केला.''यात काहीच गैर नाही. हा खेळाचा भाग आहे. मी समजू शकतो की मैदानावर असे प्रकार घडल्याने खेळाडूंची चिडचिड होणे स्वाभाविक आहे, परंतु ठिक आहे, असे घडते. माझ्यामते तुम्ही अशी धाव घेऊ शकतो. पहिल्या सामन्यातही असाच प्रकार घडला होता आणि आमच्या फलंदाजाच्या बॅटला लागून चेंडूने दिशा बदलील होती. तेव्हा आम्ही धावा घेतल्या होत्या. असा कोणताच नियम नाही, की जो तुम्हाला अशा धावा घेण्यापासून रोखू शकतो,''असे द्रविड म्हणाला.    

 

Web Title: Rohit Sharma charges towards Mohammad Nabi for stealing byes, has heated argument; India coach Dravid defends Afghanistan star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.