सावंतवाडी: विश्वचषक क्रिकेट सामन्याच्या अंतिम लढती मध्ये झालेल्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा याला धक्काच बसला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू येतना अनेक क्रिडारसिकांनी पाहिले होते.त्याच्या या नाराजी नंतर त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी सर्पक साधून त्याला धीर दिला होता. तू नाराज होऊ नको खेळात हार जीत असते तुला अजून भरपूर क्रिकेट खेळायचे आहे असा मोलाचा सल्लाही दिल्याचे लाड यांनी सांगितले. सावंतवाडी येथे विद्यार्थ्यांना क्रिकेट चे धडे देण्यासाठी आलेल्या लाड यांनी लोकमत शी संवाद साधत विविध विषयांवर आपली मते मांडली.
यावेळी लाड म्हणाले,विश्वचषक क्रिकेट च्या अंतिम सामन्यात रोहित लवकर बाद झाला त्याचा अवघड असा झेल उत्कृष्ट पध्दतीने घेतला रोहित बाद झाला नसता तर कदाचित भारत सव्वा तीनशे पर्यत गेला असता असा दावा ही त्यांनी केला आहे.पण त्यांनी भारतीय क्रिकेट बोर्ड सध्या रोहित शर्मा बाजूला करत आहे का? यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. आयपीएल हे क्रिकेट मध्ये भारतीय खेळाडूंवर मोठ्या बोली लागत नाही यावर मात्र लाड यांनी बोलण्यास नकार दिला पण आयपीएल भारताने आणला त्यामुळे येथील खेळाडूंना प्राधान्य मिळाले पाहिजे असे मतही त्यांनी मांडले सावंतवाडी तील जिमखाना मैदाना बाबत ही त्यांनी आपली भुमिका मांडली हे मैदान उत्कृष्ट झाले पाहिजे यासाठी मी नक्कीच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यां शी बोलणार असे सांगितले मला येथील खेळाडूंना मुंबई येथे घेऊन जावे लागते हे दुर्देव आहे.पण भविष्यात असे होऊ नये अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली या मैदानावर अनेक मोठमोठे खेळाडू खेळून गेल्याचेही लाड यांनी स्पष्ट केले.
क्रिकेटसाठी द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारा मी दुसरा
माझे गुरू रमाकांत आचरेकर यांना 1990 साली द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला त्यानंतर 32 वर्षांनी मला हा पुरस्कार मिळाला विशेष म्हणजे क्रिकेट साठी हा द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला असल्याचे लाड म्हणाले.अनेक दिग्गज खेळाडूं असतना हा पुरस्कार मला मिळाला हे माझे भाग्य समजते असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
सरकारबद्दल लाड यांची नाराजी
केंद्र सरकारने मला द्रोणाचार्य पुरस्कार दिला पण महाराष्ट्र सरकार ने माझ्याकडून छत्रपती क्रिडा प्रशिक्षक म्हणून पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आला पण अर्ज मागवून ही मला पुरस्कार देण्यात आला नाही असा खेद व्यक्त करत मी पुरस्कारांसाठी काम करत नसल्याचे ही त्यांनी सांगून आपली नाराजी व्यक्त केली.
अनेक खेळाडूंना घेतले दत्तक
मी क्रिकेट प्रशिक्षण देण्यासाठी पैसे घेत नाही देश विदेशातील अनेक खेळाडू हे माझ्याकडून क्रिकेट चे धडे घेतात सध्या मी शिर्डी सोलापूर येथील दोन मुला मधील क्रिकेट बघून त्यांना दत्तक घेतले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील ही एक खेळाडू ला क्रिकेट चे धडे देत असल्याचे लाड यांनी सांगितले.
आयपीएल ला अती महत्त्व दिले जात आहे
आयपीएल क्रिकेट हे आताच्या खेळाडूंसाठी घातक आहे.या मध्ये कशीही फलंदाजी केली जाते.त्यात गोलंदाजाचे हाल होतात पूर्वी रणजी तून खेळाडू घडायचे पण आता आयपीएल मधून खेळाडू घडतात पण ते भविष्यात किती टिकतात हा प्रश्नचिन्ह आहे असे मत ही लाड यांनी व्यक्त केले.