Join us  

India vs West Indies T20 Series: Rohit Sharmaची पत्रकार परिषद सुरू असताना अचानक वेगळाच आवाज सुरू झाला अन्...; पाहा धमाल Video

रोहित अतिशय गंभीरपणे मत मांडत होता त्यावेळी अचानकच तो आवाज सुरू झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 7:50 PM

Open in App

India vs West Indies T20 Series, Viral Comedy Video: भारताचा कर्णधार Rohit Sharma याने वेस्ट इंडिजविरूद्धच्या टी२० मालिकेआधी पत्रकार परिषद घेतली. या मालिकेत भारतीय संघाची रणनिती काय असेल या विषयावर रोहितने प्रकाश टाकला. रोहित शर्मानेविराट कोहलीचा फॉर्म, चहल-कुलदीप जोडी, IPL मेगालिलाव, हार्दिक पांड्याचा फिटनेस अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. याचदरम्यान, रोहित शर्मा बोलत असताना एक वेगळाच आवाज सुरू झाला. तो आवाज ऐकताच रोहित थांबला. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

रोहित शर्मा एका मुद्द्यावर अतिशय शांत व गंभीरपणे मत मांडत होता. "मी कोणत्याही मैदानावर खेळत असू... ते आमचं आवडतं मैदान असो किंवा...." रोहितचं हे बोलणं सुरू असतानाच अचानक 'थर्ड वर्ल्ड वॉर का काऊंटडाऊन ऑन... युक्रेन के लिए चौबीस...." असा अचानक वेगळाच आवाज सुरू झाला. हे अचानक नक्की काय घडलं ते रोहितलाही समजू शकलं नाही, पण रोहितने शांतपणे वाट पाहिली. ५-६ सेकंदात तो आवाज बंद झाल्यावर रोहितला हसला आणि त्याने आपलं मत मांडायला पुन्हा सुरूवात केली. पाहा तो मजेशीर व्हिडीओ-

रोहित पत्रकार परिषदेत काय म्हणाला...

रोहित शर्माने पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्याबद्दल मत मांडलं. "हार्दिक पांड्या हा असा खेळाडू आहे जो संघात असला तर तो तीनही गोष्टी चोख पार पाडू शकतो. तो उत्तम फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक आहे. त्यामुळे त्याचं संघातील स्थान खूप महत्त्वाचं असणार आहे", असं तो म्हणाला. तसेच, "मिडियावाले लोक जर विराटला सारखे प्रश्न विचारत बसले नाहीत तर सगळ्या गोष्टी आपोआप सुधारतील. मी विराटला रोज भेटतोय. तो सध्या खूप चांगल्या मनस्थितीत असून आगामी क्रिकेट सामन्यांसाठी सकारात्मक विचार करतो आहे. दडपणाचे प्रसंग कशा पद्धतीने हाताळायचे हे त्याला नीट माहिती आहे", असं उत्तर रोहितने विराटच्या मुद्द्यावर दिलं.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माविराट कोहलीहार्दिक पांड्या
Open in App