Mumbai Indians IPL 2023: मुंबईचा 'हिटमॅन' सर्वात भारी... Rohit Sharma चा धुमधडाका, केला धोनी - Virat यांनाही न जमलेला विक्रम

Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2023 MI vs DC: रोहित शर्माच्या दमदार फलंदाजीमुळेच मुंबई इंडियन्सने जिंकला पहिला सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 10:27 AM2023-04-12T10:27:29+5:302023-04-12T10:28:00+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma creates history with superb batting in Mumbai Indians win beats MS Dhoni Virat Kohli in Most Man of the Match Awards IPL 2023 MI vs DC | Mumbai Indians IPL 2023: मुंबईचा 'हिटमॅन' सर्वात भारी... Rohit Sharma चा धुमधडाका, केला धोनी - Virat यांनाही न जमलेला विक्रम

Mumbai Indians IPL 2023: मुंबईचा 'हिटमॅन' सर्वात भारी... Rohit Sharma चा धुमधडाका, केला धोनी - Virat यांनाही न जमलेला विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2023 MI vs DC: सलग दोन सामने हरणाऱ्या मुंबई इंडियन्सने अखेर यंदाच्या IPL मध्ये गुणांचे खाते उघडले. दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर त्यांनी रोमहर्षक विजय मिळवला. दोन ऑस्ट्रेलियन खेळाडू मैदानात मुंबईसाठी खेळत असताना शेवटच्या चेंडूवर २ धावा हव्या होत्या. त्यावेळी टीम डेव्हिड - कॅमेरॉन ग्रीन जोडीने चपळाईने दोन धावा काढत मुंबईला विजय मिळवून दिला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने तुफानी खेळी केली. ४५ चेंडूत ६५ धावा कुटत त्याने मुंबईच्या विजयाचा पाया रचला. त्याच्यामुळे संघाला विजय मिळवता आला आणि रोहितला सामनावीर घोषित करण्यात आले.

रोहित शर्माने आपल्या दमदार खेळीचा प्रत्यत बऱ्याच दिवसांनी चाहत्यांना दिला. रोहितने इशान किशनच्या साथीने फटकेबाजीला सुरूवात केली होती. ८व्या षटकात इशान ३१ धावांवर रन आऊट झाला. त्यानंतर रोहितने २९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पुढे फटकेबाजी करत त्याने ६ चौकार आणि ४ षटकारांच्या साथीने ४५ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. त्याच्या याच खेळीमुळे त्याला सामनावीराचा किताब मिळाला. रोहितचा हा किताब म्हणजे एक पराक्रम ठरला.

सर्वाधिक वेळा सामनावीर (Most Man of The Match Awards)

IPLमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा किताब मिळवणाऱ्यांच्या यादीत रोहित संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी होता. एबी डिव्हीलियर्स २५ वेळा तर ख्रिस गेल २२ वेळा हा किताब जिंकून रोहितच्या पुढे आहेत. रोहित आणि वॉर्नर यांच्या नावे १८ वेळा हा पुरस्कार होता. पण रोहितने दिल्ली विरूद्ध सामनावीराचा किताब जिंकत, वॉर्नरला मागे टाकले. रोहित १९ पुरस्कारांसह आता यादीत तिसरा आहे. महत्त्वाचे म्हणजे, रोहित या यादीत महेंद्रसिंग धोनी (१७) आणि विराट कोहली (१६) या दोघांच्याही पुढे असून तो सर्वाधिक पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीयांच्या यादीत अव्वल आहे.

सर्वाधिक MOM पुरस्कार मिळवणारे TOP 5

  1. एबी डिव्हिलियर्स- २५
  2. ख्रिस गेल- २२
  3. रोहित शर्मा- १९
  4. डेव्हिड वॉर्नर- १८
  5. महेंद्रसिंग धोनी- १७



रोहितचे २ वर्षांनी IPL मध्ये पहिले अर्धशतक

महत्त्वाची बाब म्हणजे रोहित शर्माने २३ एप्रिल २०२१ नंतर मंगळवारी, IPL मध्ये पुन्हा अर्धशतक झळकावले. त्याच्या खेळीमुळेच मुंबई इंडियन्सने पहिल्या विजयाची नोंद केली. हा विजय रोहितसाठी खास ठरला. रोहितने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना फॉर्म परतल्याची झलक दिली. ८०८ दिवसांनंतर रोहितने आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावले.

Web Title: Rohit Sharma creates history with superb batting in Mumbai Indians win beats MS Dhoni Virat Kohli in Most Man of the Match Awards IPL 2023 MI vs DC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.