Join us  

रोहितच्या चेहऱ्यावर एक महिन्यानंतर हसू दिसेल; हिटमॅनच्या 'लेकी'चा 'तो' video viral

बलाढ्य ऑस्ट्रेलियाने २० वर्षांनंतर पुन्हा एकदा अंतिम फेरीत भारताचा पराभव करून विश्वचषक उंचावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 1:29 PM

Open in App

Rohit Sharma Daughter Video : आयसीसी वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला अन् तमाम भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाने २० वर्षांनंतर पुन्हा एकदा अंतिम फेरीत भारताचा पराभव करून विश्वचषक उंचावला. विश्वचषकापासून एक पाऊल दूर राहिल्याने भारतीय चाहते निराश झाले. संघातील खेळाडूंना देखील ही झळ बसली अन् सामन्यानंतर ते पाहायला देखील मिळाले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा पराभवानंतर थेट ड्रेसिंग रूममध्ये गेल्याचे दिसले. आता रोहित शर्माची लेक समायराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिच्या वडिलांबद्दल भाष्य करताना दिसत आहे. खरं तर हा व्हिडीओ जुना आहे, ज्यामध्ये ती रोहित सध्या विश्रांती घेत असल्याचे म्हणते. 

व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, समायरा तिची आई रितीकासोबत बिल्डिंगमधून बाहेर येताना दिसते. यादरम्यान तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींनी त्यांचे स्वागत केले. अशातच समायराला रोहित शर्माबद्दल प्रश्न केला असता तिने भारी उत्तर दिले. तुझे पप्पा कुठे आहेत असे विचारले असता समायराने म्हटले, "ते रूममध्ये आहेत, ते खूप सकारात्मक असून एक महिन्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसेल." समायराचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हा व्हिडीओ जुना असला तरी चाहते विश्वचषकातील पराभवानंतर हा व्हिडीओ व्हायरल करत आहेत. 

भारताच्या तोंडचा घास ऑस्ट्रेलियाने पळवला किताबाच्या लढतीत नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाला शुबमन गिलच्या (४) रूपात मोठा झटका बसला. त्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (४७) आणि विराट कोहली (५४) यांनी डाव सावरला. पण ग्लेन मॅक्सवेलच्या षटकांत चुकीचा फटका मारून रोहित बाद झाला. ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम झेल घेऊन हिटमॅनला बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरीकडे विराट सावध खेळी करून भारताचा डाव पुढे नेत होता. अशातच ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने यजमानांना आणखी एक धक्का देत श्रेयस अय्यरला तंबूत पाठवले. मग विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी भारतीयांच्या आशा जिवंत ठेवल्या अन् भागीदारी नोंदवली. निर्धाव चेंडूमुळे दबाव वाढत गेल्याने भारत अडचणीत सापडला. त्यात विराटला नशिबाची साथ न मिळाल्याने बाहेर जावे लागले.  विराटने (५४) आणि राहुलने (६६) धावा करून ऑस्ट्रेलियासमोर सन्माजनक आव्हान उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. अखेर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. २४१ धावांचा पाठलाग करताना कांगारूंनी ट्रॅव्हिस हेडच्या (१३७) शतकी खेळीच्या जोरावर मोठा विजय मिळवला. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ