नेपिअर, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताने न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिकेत विजयी आघाडी मिळवली आहे. विराट कोहलीने आता विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला असून भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सुपूर्द करण्यात आले आहे. पण चौथ्या सामन्यापूर्वी चहल टीव्हीमध्ये संघातील काही खेळाडूंनी धमाल केली. यावेळी चहल टीव्हीचा कॅमेरामन झाला होता तो दस्तुरखुद्द रोहित...
भारतीय संघाने सलग तीन वन डे सामने जिंकून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 2009नंतर भारतीय संघाने प्रथमच न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. गुरुवारी खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. यावेळी न्यूझीलंडमध्ये एक वेगळा पराक्रम करण्याची संधी रोहितला आहे.
रोहितने या व्हिडीओसाठी कॅमेरामनचे काम पाहिले. या व्हिडीओमध्ये युजवेंद्र चहलबरोबर फिरकीपटू कुलदीप यादव, शुभमन गिल आणि खलील अहमद हे भारतीय संघातील खेळाडू होते.
पाहा हा खास व्हिडीओ
शुभमनला मिळणार का पदार्पणाची संधी...न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलला पदार्पणाची संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. कारण कर्णदार विराट कोहलीने शुभमनची तोंडभरून स्तुती केली होती. माझ्यापेक्षाही शुभमनमध्ये चांगली गुणवत्ता या वयामध्ये आहे, असे कोहली म्हणाला होता. कोहलीच्या म्हणण्यानुसार शुभमनला चौथ्या स्थानावर फलंदाजीची संधी मिळू शकते.
हॅमिल्टनचा इतिहास भारताच्या विरोधात
हॅमिल्टन येथे भारतीय संघाने 1981 साली पहिला सामना खेळला होता, परंतु त्यात त्यांचा पराभव झाला. या स्टेडियमवर विजय मिळवण्यासाठी 2009 साल उजाडले. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने हॅमिल्टनवर पहिल्यांदा विजयाची चव चाखली. येथे खेळलेल्या पाच सामन्यांत भारताचा तो एकमेव विजय आहे.
असा असेल संभाव्य संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, शुबमन गिल, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, खलील अहमद, कुलदीप यादव.