Join us  

Rohit Sharma, IPL 2023: फक्त ५ षटकार अन् ४४ धावा... मुंबईच्या 'हिटमॅन'ला खुणावतायत २ मोठे विक्रम

आज मुंबई इंडियन्सचा कोलकाता नाईट रायडर्सशी सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 12:02 PM

Open in App

Rohit Sharma, IPL 2023: सध्या आयपीएलमध्ये चाहत्यांना काही दिवसांपूर्वीच MS Dhoni ला  5000 धावा पूर्ण करताना पाहिले. त्यानंतर केएल राहुल सर्वात जलद 4,000 धावा करणारा फलंदाज ठरला. आता मुंबई इंडियन्सच्या आजच्या सामन्यातही असाच एक मोठा विक्रम चाहत्यांना पाहायला मिळू शकतो. रोहित शर्मा आपल्या IPL करियरमधील एका मोठ्या टप्प्याच्या अगदी जवळ आहे. तसेच तो एक आगळावेगळा विक्रमही करणार आहे. KKR विरुद्ध मुंबई इंडियन्सचा आज सामना रंगणार आहेत. या सामन्यात तो दोन महत्त्वाचे मैलाचे दगड ओलांडण्याची शक्यता आहे.

IPLचा 16वा सीझन सुरू झाला तेव्हा रोहित शर्मा रंगात दिसला नाही. पण गेल्या सामन्यातही त्याने आपला फॉर्म दाखवून दिला. त्याने घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध अर्धशतकी खेळी केली आणि अग्रभागी राहून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

5 षटकार आणि 44 धावा... रोहित दोन मोठ्या विक्रमांच्या नजीक

6000 धावांचा टप्पा- मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर केकेआरविरुद्ध खेळायचे आहे. या सामन्यात रोहित शर्माला 5 षटकार आणि 44 धावांचे अंतर पूर्ण करायचे आहे. जर त्याने मुंबईतही दिल्लीचा फॉर्म कायम ठेवला, तर आज तो आयपीएलशी संबंधित एक नव्हे तर दोन सुपर रेकॉर्डचा भाग बनताना दिसू शकतो. जर रोहित शर्माने आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर KKR विरुद्ध 44 धावा केल्या तर तो IPL मधील 6000 धावा पूर्ण करेल. म्हणजे या लीगच्या इतिहासातील तो चौथा फलंदाज ठरेल, ज्याच्या नावावर ६००० किंवा त्याहून अधिक धावा असतील. आतापर्यंत विराट कोहली, शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी ही कामगिरी केली आहे. म्हणजेच आयपीएलमध्ये 6000 धावा करणारा रोहित तिसरा भारतीय असेल.

250 षटकारांचा महापराक्रम- रोहित शर्माने दिल्लीविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 4 षटकार मारून 65 धावा केल्या होत्या. पण जर त्याने KKR विरुद्ध 5 षटकार मारले तर IPL मध्ये 250 हून अधिक षटकार मारणारा तो एकूण तिसरा आणि पहिला भारतीय फलंदाज होईल. ख्रिस गेलच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक 357 षटकार आहेत. तर एबी डिव्हिलियर्स 251 षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच रोहितलाही डिव्हिलियर्सला मागे टाकण्याची संधी असेल.

टॅग्स :आयपीएल २०२३रोहित शर्मामुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App