Rohit Sharma Fan Tattoo: भारतात क्रिकेटला धर्म मानले जाते आणि क्रिकेटपटू हा देवासारखाच असतो. याची अनेक उदाहरणे आहेत आणि अशा गोष्टी प्रत्येक दशकात वेगवेगळ्या खेळाडूंच्या बाबतीत समोर येत राहतात. चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंसाठी काहीही करू शकतात. सचिन तेंडुलकरचा चाहता सुधीर हे नाव सगळ्यांनाच लक्षात असेल. जिथे जिथे मॅच व्हायची तिथे सुधीर पोहोचायचा. सचिनच्या निवृत्तीनंतरही सुधीर सामना पाहण्यासाठी सर्वत्र पोहोचतो. त्याची क्रेझ अजूनही तशीच आहे. अशाच प्रकारचा एका जबरा फॅन भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा असल्याचे आता समोर आले आहे.
रोहित भारतीय संघाचा कर्णधार आहे. मात्र दुखापतीमुळे तो बांगलादेश विरुद्धची कसोटी मालिका खेळू शकला नाही. पण रोहित शर्माला चाहत्यांची कधीच कमतरता भासलेली नाही. रोहितने लवकरात लवकर बरे होऊन टीम इंडियाचे कर्णधारपद स्वीकारावे, अशी रोहितच्या चाहत्यांची प्रबळ इच्छा आहे. आपल्या आवडत्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी चाहते हवं ते करत आहेत. तशातच रोहितच्या एका फॅनने काहीतरी अनोखे करून दाखवले आहे. रोहितच्या या चाहत्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रोहितच्या या चाहत्याने आपल्या शरीरावर रोहितचे नाव आणि जर्सी नंबर मोठ्या अक्षरात गोंदवला आहे. तसेच त्याचे विक्रम गोंदवले आहेत. रोहितच्या वनडेमधील तीन द्विशतकांपासून ते टी२० मधील चार शतकांपर्यंत या चाहत्याने सारे विक्रम पाठीवर टॅटू स्वरूपात गोंदवले आहेत. रोहितने टी२० मध्ये कोणत्या देशांविरुद्ध शतक केले आणि त्या डावात किती धावा केल्या, हेही त्याने पाठीवर टॅटूसारखे गोंदवले आहे.
अंगठ्याच्या दुखापतीमुळे कसोटी मालिकेला मुकला रोहित शर्मा
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात रोहितला दुखापत झाली होती. तो स्लिपमध्ये उभा होता आणि झेल त्याच्याकडे आला, पण तो झेल घेऊ शकला नाही आणि चेंडू अंगठ्याला लागला. त्यानंतर तो बाहेर गेला आणि नंतर क्षेत्ररक्षणाला आला नाही. दुखापत झालेल्या अंगठ्याने त्याने नवव्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि २७ चेंडूत अर्धशतक झळकावले. पण त्यानंतर तो शेवटची वन डे आणि पूर्ण कसोटी मालिकेला मुकला.
Web Title: Rohit Sharma fan unique tattoo of Indian captain name jersey number records stats on his back see photo
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.