हिटमॅनला 'फॅट'मॅनचा टॅग! माजी क्रिकेटर म्हणतो; विराटला बघा! रोहित शर्मा फक्त...

कोण आहे तो माजी क्रिकेटर ज्यानं रोहितवर साधलाय निशाणा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 14:00 IST2024-12-12T14:00:24+5:302024-12-12T14:00:54+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma fat shamed by ex-South African cricketer says He is overweight and not a long-term cricketer anymore Virat Kohli Fitness | हिटमॅनला 'फॅट'मॅनचा टॅग! माजी क्रिकेटर म्हणतो; विराटला बघा! रोहित शर्मा फक्त...

हिटमॅनला 'फॅट'मॅनचा टॅग! माजी क्रिकेटर म्हणतो; विराटला बघा! रोहित शर्मा फक्त...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने अपयशी ठरताना दिसतोय. कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे  नेटकरी हिटमॅनला निवृत्तीचा सल्ला देतानाचा सीनही पाहायला मिळाला. त्यात आता दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटरनं रोहित शर्मावर निशाणा साधला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजानं रोहित शर्माचा फिटनेस आणि क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. कोण आहे तो माजी क्रिकेटर अन् रोहित शर्मासंदर्भात तो नेमकं काय म्हणाला त्यासंदर्भातील सविस्तर स्टोरी 
 
कोण आहे तो माजी क्रिकेटर ज्यानं रोहितवर साधलाय निशाणा?

हिटमॅनला फ्लॉप क्रिकेटरचा टॅग लावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटरचं नाव डॅरिल कलिनन (Daryll Cullinan) असं आहे. या माजी क्रिकेटरनं रोहित शर्मा हा खूप जाड (Fat) आहे, असे म्हटले आहे. एवढेच नाही तर तो फक्त 'फ्लॅट ट्रॅक'वर अर्थात पाटा किंवा सपाट खेळपट्टीवर खेळणारा खेळाडू आहे, असा उल्लेखही या माजी क्रिकेटरनं केलाय. 

हिटमॅनचा फ्लॉप शो कायम 

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघावर घरच्या मैदानात नामुष्की ओढावली होती. न्यूझीलंडच्या संघाने टीम इंडियाला क्लीन स्वीप केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पिंक बॉल टेस्टमध्ये पुन्हा त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पराभूत झालीये. भारतीय संघाच्या अपयशात फलंदाजीतील समस्याच सर्वात मोठं कारण आहे. त्यात रोहित शर्मा आघाडीवर आहे. पिंक बॉल टेस्टमध्ये ओपनिंग सोडून सहाव्या क्रमांकावर खेळतानाही तो अपयशी ठरला. मागील १२ डावात ८ वेळा रोहितला  दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.   

विराटचा दाखला देत रोहितच्या फिटनेसवर उपस्थितीत केला प्रश्न

डॅरिल कलिनन या माजी क्रिकेटरनं इनसाइडस्पोर्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये फिटनेसचा मुद्दा उपस्थितीत करत रोहित शर्माला टारेगेट केले.  रोहितला बघा अन् विराटलाही बघा.. दोघांच्यातील फिटनेसमध्ये खूप अंतर आहे. रोहित शर्माचं वजन खूप आहे. तो खूप काळ खेळणारा क्रिकेट नाही. चार किंवा पाच कसोटी मालिका खेळण्यासाठी तो फिटच वाटत नाही, असेही या माजी क्रिकेटरनं म्हटलं आहे.

Web Title: Rohit Sharma fat shamed by ex-South African cricketer says He is overweight and not a long-term cricketer anymore Virat Kohli Fitness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.