Rohit Sharma Yuzvendra Chahal, India vs Sri Lanka T20 : रोहित शर्माचा 'लाडका' खेळाडू संपवणार युजवेंद्र चहलचं करियर? क्रिकेटवर्तुळात चर्चांना उधाण

युजवेंद्र चहलला गेल्या वर्षी झालेल्या टी२० वर्ल्डकपमध्येही संघात मिळालं नव्हतं स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 02:38 PM2022-02-24T14:38:11+5:302022-02-24T14:38:55+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma Favourite Spinner may demolish Yuzvendra Chahal Career in T20 India vs Sri Lanka Virat Kohli RCB | Rohit Sharma Yuzvendra Chahal, India vs Sri Lanka T20 : रोहित शर्माचा 'लाडका' खेळाडू संपवणार युजवेंद्र चहलचं करियर? क्रिकेटवर्तुळात चर्चांना उधाण

Rohit Sharma Yuzvendra Chahal, India vs Sri Lanka T20 : रोहित शर्माचा 'लाडका' खेळाडू संपवणार युजवेंद्र चहलचं करियर? क्रिकेटवर्तुळात चर्चांना उधाण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext


Rohit Sharma Yuzvendra Chahal, India vs Sri Lanka T20 : भारताचा अनुभवी लेग स्पिनर युजवेंद्र चहल याने आतापर्यंत टीम इंडियाला अनेक सामने जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. एकेकाळी तो टीम इंडियाचा अविभाज्य घटक होता. पण टी२० विश्वचषकात त्याला संधी न मिळाल्यामुळे संघाकडे त्यालाही पर्याय आहेत हे स्पष्ट झालं. सध्यादेखील चहलप्रमाणेच टीम इंडियामध्ये एक प्रतिभावान फिरकी गोलंदाज आहे, जो युझी चहलचं करियर उद्ध्वस्त करू शकतो अशी चर्चा रंगली आहे. तो म्हणजे रवि बिश्नोई. विराट कोहली संघाचा कर्णधार असताना टीम इंडिया आणि RCB अशा दोन्ही संघात चहलला संधी मिळाली होती. पण महत्त्वाची बाब म्हणजे, आता त्याला टक्कर देणारा खेळाडू हा कर्णधार रोहित शर्मा याचा लाडका खेळाडू असल्याचं म्हटलं जात आहे. अशा परिस्थितीत T20 World Cupच्या दृष्टीने विचार करता तो चहलला चांगलीच टक्कर देऊ शकेल असं बोललं जात आहे.

भारतीय संघात युजवेंद्र चहलसारखा स्मार्ट फिरकी गोलंदाज म्हणजे रवी बिश्नोई (Ravi Bishnoi). रवी बिश्नोई हा उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याचे चेंडू खेळणं कोणात्याही गोलंदाजासाठी सोपं नसल्याचे विंडिजच्या मालिकेत दिसलंच आहे. रवी अतिशय आक्रमकपणे गोलंदाजी करतो. रवी बिश्नोईकडे संथ खेळपट्टीवरही झटपट विकेट घेण्याची कला आहे. तसेच, २०२०च्या U19 वर्ल्ड कपमध्येही त्याने आपली चमक दाखवून दिली होती. त्यामुळे त्याला टीम इंडियाचं तिकीट मिळालं. महत्त्वाचे म्हणजे, आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यातच त्याला सामनावीराचा किताबही मिळाला होता.

रवी बिश्नोईने IPLमध्ये जबरदस्त खेळ करून सर्वांची मने जिंकली आहेत. पंजाब किंग्जकडून खेळताना त्याने २३ सामन्यांत २४ बळी घेतले. त्याच्या गोलंदाजीची प्रतिभा पाहूनच नव्याने आलेल्या लखनौ संघाने त्याला चार कोटींची किंमत देत मेगालिलावाआधीच करारबद्ध केलं होतं. रवी त्याच्या संथ आणि हवेत फ्लाईट गोलंदाजीसाठी ओळखला जातो. तो चेंडू इतका हळू फेकतो की त्यावर मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज अधिकत: झेलबाद होतात. त्यामुळे बहुतांशी चहलसारखाच गोलंदाजी करणार आणि त्याच्यापेक्षा अधिक परिणामकारक गोलंदाजी करणारा गोलंदाज संघात आल्याने हळूहळू चहलला संघातून बाहेर व्हावे लागू शकतं अशी चर्चा क्रिकेटवर्तुळात दिसत आहे.

Web Title: Rohit Sharma Favourite Spinner may demolish Yuzvendra Chahal Career in T20 India vs Sri Lanka Virat Kohli RCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.