Join us  

रोहित शर्मा, गेल यांचे विक्रम उद्ध्वस्त, 'या' फलंदाजानं टी-20त केला नवा विक्रम

मुन्रोची विस्फोटक फलंदाजी, टी-20त अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2018 5:17 PM

Open in App

नवी दिल्ली - न्यूझीलंडचा विस्फोटक फलंदाज कोलिन मुन्रोनं वेस्ट इंडिज विरोधात सुरु असलेल्या टी-20 सामन्यात पुन्हा एकदा स्फोटक फलंदाजी केली. मुन्रोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.  12 महिन्यामध्ये त्यानं टी-20मध्ये तीन शतक झळकावली आहेत.  टी-20मध्ये तीन शतकं नावावर असणारा मुन्रो हा एकमेव फलंदाज आहे. 

कोलिन मुन्रोनं 51चेंडूत 104 धावांची वादळी खेळी केली. या खेळीमध्ये त्यानं दहा षटकार आणि तीन चौकार लगावले. याआधी कॉलिन मुनरोने भारत (109) आणि बांगलादेश (101)विरुद्ध टी-20 सामन्यात शतक झळकावलं होतं. या शतकासह मुनरोने वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल, रोहित शर्मा आणि एविन लुईसच्या नावे असलेला 2 शतकांचा विक्रम मोडीत काढला आहे. 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलँडने वेस्ट इंडिजसमोर तगडं आव्हान निर्माण केलं. या मालिकेत आपल्या फॉर्मशी झगडणाऱ्या मार्टीन गप्तिलने (63)आक्रमक फलंदाजी केली. वेस्ट इंडिजकडून कार्लोस ब्रेथवेटने 50 धावांत 2 विकेट घेतल्या.  मुन्रोच्या विस्फोटक फलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडनं 20 षटकांत पाच बाद 243 धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंडनं वेस्ट इंडिजचा 120 धावांनी पराभव केला. 

दरम्यान, पावसानं रद्द झालेल्या पहिल्या दुसऱ्या टी-20 सामन्यातही मुन्रोनं वादळी खेळी केली होती. मुन्रोनं 23 चेंडूत 11 चौकार आणि तीन षटकारांसह 286च्या स्ट्राइक रेटनं 66 धावा पटकावल्यात. यावेळी त्यानं फक्त चार वेळा एकेरी धाव घेतली.  त्याबरोबरच 2018 मध्ये पहिलं अर्धशतक मुन्रोच्या नावावर जमा झालं आहे. त्याचप्रमाणे मुन्रोनं जगातील सहावे तर न्यूझीलंडकडून दुसरे जलद अर्धशतक झळकावलं. मुन्रोच्याआधी गेल (17 चेंडू),  मायबर्घ (17 चेंडू), स्टर्लिंग (17चेंडू), मुन्रो (14 चेंडू) आणि युवराज सिंह (12 चेंडू) यांनी जदल अर्धशतक ठोकली आहेत.  न्यूझीलंडकडून सर्वात जलद अर्धशतक मुन्रोच्याच नावावर आहेत. 2016 मध्ये मुन्रोनं लंकेविरोधात 14 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर मार्टिन गप्टिल आहे. गप्टिलनं 2016मध्येच लंकेविरोधात 19 चेंडूत 50 धावा केल्या होत्या.   

टॅग्स :रोहित शर्मान्यूझीलंडवेस्ट इंडिज