मुंबई : भारताचा सालामीवीर रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन शतके झळाकवली होती. त्याचबरोबर रोहितने या सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही पटकावला होता. पण रोहितने या सामन्यातील धावसंख्येच्या जोरावर एक गोष्ट गाठली आहे. रोहितने या दोन शतकांच्या जोरावर कसोटी क्रमवारीतील कारकिर्दीती़ल सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे.
रोहितचे कसोटी संघात स्थान निश्चित नव्हते. वेस्ट इंडिजमधील कसोटी मालिकेत रोहितला संघात स्थान देण्यात आले नव्हते. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहितला सलामीला खेळण्याची संधी दिली आणि त्याने या संधीचे सोने केले. या सामन्यात दोन्ही डावांत रोहितने शतक झळकावत आपली निवड सार्थ असल्याचे दाखवून दिले.
रोहितने दोन्ही डावांत शतके झळकावत एकूण 303 धावा केल्या. या 303 धावांसह रोहितने कसोटी क्रमवारीत थेट 37 स्थानांची भरारी घेतली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला रोहित हा कसोटी क्रमवारीमध्ये 17 व्या स्थानी पोहोचला आहे.
भारताच्या रोहित शर्माने पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला आला आणि त्यने दोन्ही डावांमध्ये शतके झळकावली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहितला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. या सामन्यानंतर रोहितने रिषभ पंतच्या करीअरचे काय होऊ शकते, याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. सध्याच्या घडीला तरी पंत हा कसोटी संघात बसत नाही, असे रोहितला म्हणायचे आहे का, ते जाणून घ्या...
सामन्यानंतर रोहितला पंतबाबत प्रश्न विचारला गेला, त्यावर रोहित म्हणाला की, " पंत हा एक गुणवान खेळाडू आहे. यापूर्वीही त्याची कामगिरी साऱ्यांनी पाहिली आहे. प्रत्येकाला तो संघाचा एक भाग असावा असे वाटू शकते. पण सध्याच्या घडीला तो संघाच्या बाहेर आहे. त्यामुळे या घडीला त्याने फलंदाजी आणि यष्टीरक्षणावर अधिक भर देणे गरजेचे आहे. माझ्यामते सहाय्यक प्रशिक्षक पंतकडून काही गोष्टी घोटवून घेतील, असा मला विश्वास आहे."
या सामन्यात वृद्धिमान साहाने यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती. साहाबाबत रोहित म्हणाला की, " साहाकडून या सामन्यात दमदार यष्टीरक्षण पाहायला मिळाले. कारण या सामन्यातील खेळपट्टीवर यष्टीरक्षण करणे, सोपे नव्हते. कारण काहीवेळा चेंडू संथ येत होता, तर काहीवेळा खाली राहत होता, तर कधीकधी उंच उडत होता. त्यामुळे या सामन्यात यष्टीरक्षण करणे सोपे नव्हते. साहाने परिस्थितीनुसार यष्टीरक्षण केले आणि त्यामुळेच विजयात साहाचाही मोठा वाटा
Web Title: Rohit Sharma got The best place to be in a career with two centuries
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.