जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल जिंकल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंना आयसीसी जागतिक कसोटी क्रमवारीत मोठा फायदा झालेला पाहायला मिळाला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यानं जागतिक कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं. ( Kane Williamson is the new number 1 ranked Test batsman in the world) भारताविरुद्धच्या फायनलपूर्वी केननं कसोटी फलंदाजांतील अव्वल स्थान गमावले होते, परंतु फायनलमध्ये त्यानं दोन्ही डावांत ४९ व नाबाद ५२ धावा करून पुन्हा अव्वल स्थान पटकावले. आयसीसीनं आज जाहीर केलेल्या क्रमवारीत भारताच्या रोहित शर्मानंही ( Rohit Sharma) मोठा पराक्रम केला.
गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स ( ९०८), भारताचा आर अश्विन ( ८६५), न्यूझीलंडचा टीम साऊदी ( ८२४), ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड ( ८१६) आणि न्यूझीलंडचा निल वॅगनर ( ८१०) हे टॉप फाईव्हमध्ये आहेत. अष्टपैलू खेळाडूंमध्ये आर अश्विनला अव्वल स्थान गमवावे लागले. वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर ( ३८४) व इंग्लंडचा बेन स्टोक्स ( ३७७) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. आर अश्विन ३७७ व रवींद्र जडेजा ३५८ अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या, तर शाकिब अल हसन ( ३३८) पाचव्या क्रमांकावर आहे. ( Jason Holder becomes the new number 1 ranked Test all-rounder in the world)