ठळक मुद्दे रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-20 मधील सर्वात जलद शतक लगावण्याच्या विक्रमाची बरोबरी केलीरोहित शर्मा भारताकडून टी-20 मध्ये सर्वात जलद शतक लगावणारा फलंदाज ठरला श्रीलंकेविरोधात दुस-या टी-20 सामन्यात रोहित शर्माने तुफानी फलंदाजी करत 43 चेंडूत 118 धावा केल्या
इंदूर - भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माने आपला जबदरस्त फॉर्म कायम ठेवला आहे. रोहित शर्माने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय टी-20 मधील सर्वात जलद शतक लगावण्याच्या दक्षिण अफ्रिकेच्या डेव्हिड मिलरच्या विक्रमाची बरोबरी केली. यासोबतच रोहित शर्मा भारताकडून टी-20 मध्ये सर्वात जलद शतक लगावणारा फलंदाज ठरला आहे. श्रीलंकेविरोधात दुस-या टी-20 सामन्यात रोहित शर्माने तुफानी फलंदाजी करत 43 चेंडूत 118 धावा केल्या. फक्त 35 चेंडूत त्याने आपलं शतक पुर्ण केलं. रोहित श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई करत होता, त्यावेळी पत्नी रितीका मैदानात उपस्थित होती. रोहितने शतक ठोकल्यानंतर इन्स्टाग्रामवर रितीकासोबतचा सेल्फी शेअर केला आहे. 'हाच माझा लकी चार्म' अशी कॅप्शन त्याने फोटोला दिली आहे. विशेष म्हणजे रोहितने दुस-या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेविरोधात द्विशतक झळकावलं तेव्हादेखील रितीका मैदानात उपस्थित होती.
रोहितचं हे टी-20 मधील दुसरं शतक असून, त्याची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी रोहितने ऑक्टोबर 2015 मध्ये धर्मशाला येथे दक्षिण अफ्रिकेविरोधात आपलं पहिल शतक झळकावलं होतं. त्यावेळी रोहितने 106 धावांची खेळी केली होती.
यासोबतच रोहित शर्मा टी-20 मध्ये भारताकडून सर्वात जलद शतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे. रोहितच्या आधी हा रेकॉर्ड लोकेश राहुलच्या नावे होता. लोकेश राहुलने गतवर्षी 27 ऑगस्टला वेस्टइंडिजविरोधात 46 चेंडूत शतक ठोकलं होतं. राहुलने श्रीलंकेविरोधातील सामन्यात 49 चेंडूत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 89 धावा केल्या. त्याचं दुसरं शतक हुकलं.
दक्षिण अफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने याचवर्षी 29 ऑक्टोबरला बांगलादेशविरोधात 35 चेंडूत शतक ठोकलं होतं. डेव्हिड मिलरने या सामन्यात फक्त 35 चेंडूत शतक ठोकत आपल्या संघातील रिचर्ड लेव्हीचा जलद शतक ठोकण्याचा विक्रम मोडला होता. लेव्हीने 2012 मध्ये न्यूझीलंडविरोधात 45 चेंडूत शतक ठोकलं होतं.
‘हिटमॅन’ रोहित शर्मा याने झळकालेल्या झंझावाती शतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या नियंत्रित मा-याच्या जोरावर भारताने दुस-या टी२० सामन्यात श्रीलंकेचा ८८ धावांनी पराभव केला. यासह तीन सामन्यांची मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली. रोहित - राहुल यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने २० षटकात ५ बाद २६० धावांचा एव्हरेस्ट उभारला. या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव १७.२ षटकात १७२ धावांत संपुष्टात आणला.
Web Title: Rohit Sharma hits fastest century in t-20
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.