सेंच्युरिअन - भारतीय क्रिकेट संघाचे सलामीचे फलंदाज टी-20 फॉरमॅटसाठी अत्यंत योग्य असल्याचं मानलं जातं. मात्र दक्षिण आफ्रिका दौ-यात फलंदाजांनी हवं तसं प्रदर्शन केलेलं नाही. यावेळी हिटमॅन रोहित शर्माचा परफॉर्मन्स सर्वात फ्लॉप ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधातील दुस-या सामन्यात रोहित शर्मा गोल्डन डकवर आऊट झाला. टॉस जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या रोहित शर्माला ज्युनिअर डालाने खातंही खोलू दिलं नाही आणि पायचीत करत तंबूत परतवलं. रोहित फक्त एकच चेंडू खेळू शकला. या दौ-यातील टी-20 मधील रोहित शर्माचा हा पहिला गोल्डन डक ठरला.
रोहितच्या खराब कामगिरीमुळे चाहते प्रचंड नाराज आहेत. गोल्डन डकमुळे रोहित शर्माच्या नावावर अशा रेकॉर्डची नोंद झाली आहे, जो त्याला कदापि आवडणार नाही. सेंच्युरिअनमधीय दुस-या टी-20 सामन्यात गोल्डन डकवर आऊट झाल्यानंतर रोहित शर्मा टी-20 सामन्यात खातं न खोलताच आऊट होणा-या भारतीय फलंदाजांच्या यादीत टॉपवर पोहोचला आहे. टी-20 सामन्यात चार वेळा गोल्डन डकवर आऊट होण्याचा रेकॉर्ड रोहितच्या नावावर झाला आहे.
या सामन्याधी 3 गोल्डन डकसोबत रोहित शर्मा आशिष नेहरा आणि ऑलराऊंटर युसूफ पठाणसोबत होता. मात्र सामन्यानंतर रोहित शर्मा गोल्डन डकच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर पोहोचला आहे. टी-20 सामन्यांमध्ये रोहित शर्माच्या 4 गोल्डन डकनंतर क्रमांक लागतो युसूफ पठाण आणि आशिष नेहराचा. दोघांच्याही नावे 3 गोल्डन डक आहेत.
क्रिकेटमध्ये जेव्हा एखादा फलंदाज एकही धाव न करता आऊट होतो तेव्हा त्याला डक म्हणतात. पण जर फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाद झाला तर त्याला गोल्डन डक म्हणतात. तसंच जेव्हा एखादा फलंदाज एकही चेंडू न खेळता आऊट होतो तेव्हा त्याला डायमंड डक म्हणतात.
हेन्रिक क्लासेन (६९) आणि कर्णधार जेपी ड्युमिनी (६४*) यांनी झळकावलेल्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेने दुस-या टी२० सामन्यात भारताचा ६ गड्यांनी पराभव केला. यासह द. आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली असून शनिवारी रंगणार अखेरचा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक असेल.
भारताने दिलेल्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना द. आफ्रिकेने ४ फलंदाजांच्या मोबदल्यात ८ चेंडू राखून १८९ धावा काढल्या. अडखळती सुरुवात झाल्यानंतर यजमान पुन्हा एकदा पराभवाच्या छायेत आले होते. परंतु, क्ल्सासेन - ड्युमिनी यांनी तिसºया गड्यासाठी ९३ धावांची निर्णायक भागीदारी करुन संघाच्या विजयाचा पाया रचला. क्लासेनने ३० चेंडूत ३ चौकार व ७ षटकारांची आतषबाजी करत सामना यजमानांच्या बाजूने झुकविला.
Web Title: Rohit Sharma hold record of most ducks in t-20
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.