रोहित शर्मा आता प्रश्नचिन्ह बनला आहे! भारताच्या माजी खेळाडूने केला धक्कादायक दावा 

मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी खूप मोठा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 05:41 PM2023-12-21T17:41:15+5:302023-12-21T17:42:08+5:30

whatsapp join usJoin us
'Rohit Sharma Is A Question Mark...': former India batter Sanjay Manjrekar Stunning Claim Amid Mumbai Indians Captaincy Row | रोहित शर्मा आता प्रश्नचिन्ह बनला आहे! भारताच्या माजी खेळाडूने केला धक्कादायक दावा 

रोहित शर्मा आता प्रश्नचिन्ह बनला आहे! भारताच्या माजी खेळाडूने केला धक्कादायक दावा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024  (Marathi News)  :  मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी खूप मोठा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सकडून मुंबईच्या ताफ्यात पुनरागमन करणाऱ्या हार्दिक पांड्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. Mumbai Indians चा हा निर्णय चाहत्यांना आवडलेला नाही आणि सोशल मीडियावरून त्यांनी सर्व राग व्यक्त केला. रोहितच्या नेतृत्वाखाली MI  ने पाच जेतेपदं जिंकली आहेत.  मुंबई फ्रँचायझीचा हा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक जरी असला, तरी भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर ( Sanjay Manjrekar) यांच्या मते योग्य वेळी योग्य निर्णय घेतला गेला आहे. 


पण, मांजरेकर यांनी रोहितच्या ट्वेंटी-२० फॉरमॅटमधील फलंदाज म्हणून भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. ''ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये रोहित शर्मा एक फलंदाज म्हणूनही माझ्यासाठी आता प्रश्नचिन्ह बनला आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने आक्रमक फटकेबाजी केली खरी, परंतु ट्वेंटी-२० फॉरमॅट हा पूर्णपणे वेगळा आहे. वन डेत तुम्हाला माहित असते की तुमच्याकडे ५० षटकं आहेत. त्यानुसार त्यापद्धतीने फलंदाजी होते आणि गोलंदाजही वेगळ्या टप्प्यात मारा करतात,''असे मांजरेकर यांनी मत मांडले.  


मुंबई इंडियन्सच्या लाईनअपमध्ये आता सूर्यकुमार यादव हाच भरवशाचा फलंदाज असल्याचा दावाही मांजरेकर यांनी केला आहे. ते म्हणाले,''मुंबई इंडियन्सने मोठी रक्कम देण्यापूर्वी दोन पर्व इशान किशन चांगला खेळला होता. किरॉन पोलार्डची जागा भरून काढण्याचा टीम डेव्हिड अजूनही प्रयत्न करतोय. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादव हाच एक भरवशाचा फलंदाज त्यांच्याकडे आहे.''


 रोहित शर्मा २०२२ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उपांत्य फेरीनंतर भारताच्या ट्वेंटी-२० त संघात खेळलेले नाहीत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही मर्यादित षटकांच्या मालिकेतून रोहितने विश्रांती घेतली. आता तो थेट कसोटी मालिकेत खेळणार आहे. 
 

Web Title: 'Rohit Sharma Is A Question Mark...': former India batter Sanjay Manjrekar Stunning Claim Amid Mumbai Indians Captaincy Row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.