Join us  

IND vs Aus : विराट कोहलीने तयार केलाय हा संघ, रोहित शर्मा फक्त...! गौतम गंभीरचं मोठं विधान 

IND vs Aus : भारतीय संघानं तिसरी कसोटीही तीन दिवसांत जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 5:26 PM

Open in App

IND vs Aus : भारतीय संघानं तिसरी कसोटीही तीन दिवसांत जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दिल्ली कसोटी जिंकल्यानंतर माजी सलामीवीर गौतम गंभीर याने कर्णधार रोहित शर्मा याचे कौतुक केले. रोहित शर्मा हा क्लास बॅट्समनसोबतच एक उत्तम कर्णधारही आहे, यात शंका नाही . विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितने टीम इंडियाचे कर्णधारपद स्वीकारले आणि तोही चांगली कामगिरी करत आहे . रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या मार्गावर आहे. पण, या सगळ्यामध्ये गंभीरने एक मोठं वक्तव्य केलं आहे.

ऑस्ट्रेलियाचं वाढलं टेंशन! पॅट कमिन्सच्या फ्लाईटमधून दोघं माघारी परतले, आता मोजकेच स्टार उरले

गंभीर म्हणाला की, रोहितने स्वत:चा मार्ग तयार केलेला नाही. माझा नेहमीच विश्वास आहे की रोहित एक महान कर्णधार आहे, विशेषत: या फॉरमॅटमध्ये. पण त्याच्या या यशस्वी मार्गाची सुरुवात विराट कोहलीने केली आहे. विराट कोहलीने हा संघ तयार केला आहे.  जेव्हा विराटने कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारले तेव्हा त्याने चमत्कार केले. रोहित त्याच मार्गावर आहे. रोहितने नवीन मार्ग तयार केलेला नाही. विराट ज्या प्रकारे अश्विन आणि जडेजाला वापरत होता, रोहितही तेच करत आहे.

अष्टपैलू रवींद्र जडेजाने दुसऱ्या कसोटीत 42 धावांत 7 विकेट घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. भारतीय कर्णधार रोहितने 31 धावा केल्या. पुजारा 31 धावा करून नाबाद राहिला. अशाप्रकारे दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाचा ६ विकेटने पराभव झाला. रोहित आणि कोहली यांच्यातील सर्वोत्तम कर्णधार कोण हे गंभीरने सांगितले नाही. त्याऐवजी तो म्हणाला की रोहितसमोर सर्वात मोठे आव्हान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत जिंकण्याचे असेल.

गंभीरने म्हणाला, विराट कोहलीने ही टीम बनवली आहे. यामध्ये मोहम्मद शमी, सिराज, जसप्रीत बुमराह, अश्विन, जडेजा आणि अक्षर यांचा समावेश आहे. या खेळाडूंमुळेच विराटला यश मिळाले.  त्यामुळे सर्वोत्तम कर्णधार कोण हे मी सांगू शकत नाही.  रोहितचे मोठे आव्हान परदेश दौऱ्यावर असेल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माविराट कोहलीगौतम गंभीर
Open in App