Join us  

Rohit Sharma, India vs West Indies 1st T20 : सामना जिंकला, तुफानी फलंदाजीही केली तरी रोहित शर्माला सतावतंय 'या' गोष्टीचं दु:ख

रोहितने १९ चेंडूत ४० धावांची फटकेबाजी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 12:46 PM

Open in App

Rohit Sharma, India vs West Indies 1st T20 : भारतीय संघाने पाहुण्या वेस्ट इंडिजला पहिल्या टी२० मध्ये पराभूत करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. निकोलस पूरनच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने भारताला १५८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने १९ चेंडूत ४० धावा कुटल्या. त्याने संघाला दिलेली दमदार सुरूवात आणि शेवटच्या टप्प्यात सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यरची फटकेबाजी यामुळे भारताने ६ गडी राखून सामना जिंकला. असे असूनही रोहित शर्माला एका गोष्टीची खंत असल्याचं त्याने सामन्या नंतर बोलताना सांगितलं.

"आम्हाला चांगली सुरुवात मिळाली होती. तरीही शेवटी सामना थोडा अटीतटीचा झाला. आम्ही सामना आधीच संपवायला हवा होता. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात आम्हाला आणखी सुधारणा करण्यास वाव आहे. आम्ही मधल्या फळीत काही प्रयोग करून पाहिले, पण त्याचा या सामन्यात फारसा उपयोग झाला नाही", अशा शब्दात रोहितने आपली खंत व्यक्त केली. "असं असलं तरी सामना जिंकल्याचा मला आणि सहकाऱ्यांना नक्कीच आनंद झाला आहे. या विजयामुळे आमच्या संघाला आत्मविश्वास मिळाला", असे रोहित म्हणाला.

सध्याच्या घडीला आमच्याकडे खूप चांगले खेळाडू आहेत. श्रेयस अय्यर सारख्या खेळाडूला संघाबाहेर बसावं लागतंय यावरूनच याचा अंदाज येतो. त्याला संघाबाहेर ठेवणं हा खूपच कठीण निर्णय होता. पण सध्या संघाची जी गरज आहे ती पूर्ण करणं अधिक गरजेचं आहे. आम्हाला मधल्या फळीत असा खेळाडू हवा आहे जो गोलंदाजीही करू शकेल. पण संघातील जागेसाठी स्पर्धा असणं हे चांगलं लक्षण आहे. तशातच आता जसजसे काही अनफिट खेळाडू तंदुरूस्त होतील त्यावेळी ही निवड आणखी कठीण होईल", असंही रोहितने स्पष्ट केलं.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्मासूर्यकुमार अशोक यादववेंकटेश अय्यर
Open in App