Rohit Sharma Ishan Kishan Sad Face Photos Viral, IPL 2022: Mumbai Indians च्या आठव्या पराभवानंतर रोहित, इशानचे फोटो झाले व्हायरल, चाहतेही झाले भावूक

रोहित (१६ कोटी) आणि इशान (१५.७५ कोटी) हे मुंबईचे दोन सर्वात महागडे खेळाडू आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 05:02 PM2022-04-25T17:02:34+5:302022-04-25T17:09:14+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma Ishan Kishan Sad Face Photos Viral Mumbai Indians Fans gets emotional as team ruled out of IPL 2022 | Rohit Sharma Ishan Kishan Sad Face Photos Viral, IPL 2022: Mumbai Indians च्या आठव्या पराभवानंतर रोहित, इशानचे फोटो झाले व्हायरल, चाहतेही झाले भावूक

Rohit Sharma Ishan Kishan Sad Face Photos Viral, IPL 2022: Mumbai Indians च्या आठव्या पराभवानंतर रोहित, इशानचे फोटो झाले व्हायरल, चाहतेही झाले भावूक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma Ishan Kishan Sad Face Photos Viral, IPL 2022: स्पर्धेच्या इतक्या वर्षांच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या Mumbai Indians रविवारी आपल्या सलग आठव्या पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईच्या विरोधात लखनौचा कर्णधार लोकेश राहुलने सलग दुसरे शतक झळकावले. या शतकाच्या बळावर लखनौने मुंबईला १६९ धावांचे आव्हान दिले. पण हे आव्हानही मुंबईला पार करता आले नाही. २० षटकांत केवळ १३२ धावा करणाऱ्या मुंबईचा आठव्या सामन्यात ३६ धावांनी पराभव झाला. या लाजिरवाण्या पराभवानंतर मुंबईचे दोनही सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांचे फोटो व्हायरल झाले. या फोटोंकडे पाहून मुंबईचे फॅन्सही भावूक झाल्याचे दिसून आले.

मुंबई इंडियन्सच्या संघातील सर्वात महागडे दोन खेळाडू म्हणजे त्यांचे सलामीवीर. रोहित शर्माला १६ कोटींच्या किमतील रिटेन करण्यात आले होते. तर इशान किशनला १५.७५ कोटींच्या बोलीला संघात घेण्यात आले होते. पण दोघांनीही संघाची आणि चाहत्यांनी पूर्णपणे निराशा केली. पहिले एक-दोन सामने चांगले खेळल्यानंतर इशान किशनची गाडी रूळावरून घसरली. रोहितला तर पहिल्यापासूनच सूर गवसला नाही. त्यामुळे मुंबईला आठच्या आठ सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. या पराभवासह मुंबईच्या संघाचा प्रवास संपुष्टात आला. आता उर्वरित सामने केवळ औपचारिकता म्हणून खेळले जाणार आहेत. तशातच सामन्यानंतर या दोघांचा चेहरा पडला होता. ते फोटो प्रचंड व्हायरल झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, मुंबईच्या संघाला यंदाच्या हंगामात एकही सामना जिंकता आला नाही. कालच्या सामन्यातील पराभवाबरोबरच मुंबईच्या प्ले-ऑफ्सच्या आशा मावळल्या. ड्रेसिंग रूममध्ये पूर्णपणे शांततेचे वातावरण दिसून आले. इशान किशन आणि रोहित शर्मा दोघेही उदास असल्याचे दिसले. दोघांचाही चेहरा रडवेला झाला होता. त्यामुळे सोशल मीडियावरही चाहत्यांमध्ये उदास आणि दु:खी वातावरण दिसून आले.

Web Title: Rohit Sharma Ishan Kishan Sad Face Photos Viral Mumbai Indians Fans gets emotional as team ruled out of IPL 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.