इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या ताफ्यात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला अन् पाचवी कसोटी रद्द करावी लागली. मँचेस्टर कसोटी रद्द झाल्यानंतर भारतीय खेळाडू इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) दुसऱ्या टप्प्यासाठी यूएईत दाखल होण्यासाठी तयार झाले आहेत. आयपीएल फ्रँचायझी त्यांच्या खेळाडूंसाठी चार्टर्ड फ्लाईट्सची व्यवस्था करत आहेत. मँचेस्टर कसोटीच्या आदल्या दिवशी संघाचे फिजिओ योगेश परमार यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या. रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, इशान शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज व चेतेश्वर पुजारा हे परमार यांच्या संपर्कात आले होते आणि त्यामुळे त्यांच्या प्रकृतीकडे बीसीसीआयची टीम लक्ष ठेऊन आहे. अशात रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
भारतीय क्रिकेटपटूचा अमेरिकेत डंका, अखेरच्या षटकात टोलवले ६ षटकार; २० चेंडूंत कुटल्या ११२ धावा
बीसीसीआय व आयपीएल फ्रँचायझींनी केलं फिंगर क्रॉस...आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून यूएईत खेळवण्यात येणार आहे. पाचव्या कसोटीपूर्वी टीम इंडियाचे फिजिओ योगेर परमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि मँचेस्टर कसोटीच रद्द करावी लागली. या वृत्तानंतर बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझी हे रोहित, शमी, सिराज, इशांत, पुजारा आणि जडेजा यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत. हे सर्व खेळाडू फिजिओ योगेश परमार यांच्या संपर्कात आले होते, असे वृत्त InsideSportनं दिले आहे. त्यामुळे हे खेळाडू आयपीएलच्या काही सामन्यांना मुकणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
रोहित, जसप्रीत व सूर्यकुमार यांच्याबाबत मोठे अपडेट्सरोहित शर्मी, जसप्रीत बुमराह व सूर्यकुमार यादव हे मुंबई इंडियन्सचे प्रमुख खेळाडू आहेत आणि त्यांच्यापैकी एकाचेही मुकणे, गतविजेत्यांना परवडणारे नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये धाकधूक होती, परंतु त्यांची चिंता मिटवणारी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित, जसप्रीत व सूर्या हे यूएईत दाखल झाले आहेत. रोहित शर्मानं त्याच्या पत्नी व मुलीसोबतचा फोटो पोस्ट करून हे अपडेट्स दिले आहेत. या सर्वांना सहा दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.
Mumbai Inidian Matches Schedule :
19 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून23 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, सायं. 7.30 वाजल्यापासून26 सप्टेंबर - पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, सायं. 7.30 वाजल्यापासून28 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून2 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून5 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून8 ऑक्टोबर - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून