नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेतील दौ-यानंतर टीम इंडिया पुढील महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नियमित कर्णधार विराट कोहली, एम. एस. धोनीला आराम देण्यात आला आहे. तर मुंबईकर रोहित शर्माकडे कर्णधारपदाची आणि शिखर धवनकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ही तिरंगी टी२० मालिका ६ ते १८ मार्चदरम्यान होणार असून, त्यात तिसरा संघ बांगलादेश असणार आहे. विजय शंकर, दिपक हूड्डा आणि ऋषभ पंत यांना 15 जणांमध्ये संधी देण्यात आली आहे. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची आज बैठक झाली. यामध्ये अनुभवी खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. संघामध्ये युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह आणि कुलदिप यादव, हार्दिक पांड्या यांना आराम दिला आहे.
असा आहे भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उप-कर्णधार), केएल राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), दिपक हूड्डा, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दुल ठाकुर, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत.
Nidahas Trophy (T20I series) |
S. No. | Date | Match | Venue | |
1 | 6-March | 1st T20I Sri Lanka v India | Colombo | |
2 | 8-March | 2nd T20I India v Bangladesh | Colombo | |
3 | 10-March | 3rd T20I Sri Lanka v Bangladesh | Colombo | |
4 | 12-March | 4th T20I Sri Lanka v India | Colombo | |
5 | 14-March | 5th T20I Bangladesh v India | Colombo | |
6 | 16-March | 6th T20I Sri Lanka v Bangladesh | Colombo | |
7 | 18-March | Final | Colombo |
Web Title: Rohit Sharma to lead India in Nidahas Trophy 2018
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.