Join us  

न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान

न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 10:42 PM

Open in App

India’s squad for the three Tests against New Zealand : भारतीय नियामक मंडळाने (BCCI) न्यूझीलंडविरुद्धच्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघात जसप्रीत बुमराहकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याचे दिसून येते. तो आता पुन्हा एकदा संघाचा उपकर्णधार झाला आहे. बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत ही जबाबदारी कुणाकडेही देण्यात आली नव्हती. त्यामुळे यावेळी तो मान कुणाला मिळणार? अशी चर्चाही रंगली होती. या शर्यतीत शुबमन गिलच्या नावाचाही समावेश होता. पण खास डाव साधण्यासाठी इराद्याने बीसीसीआयने ही जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे सोपवल्याचे दिसते.

काय आहे तो डाव? ज्यामुळे बुमराह होईल टीम इंडियाचा पुढचा कॅप्टन

जसप्रीत बुमराहला  याआधीही उप कर्णधार असा टॅग लागला होता.  एवढेच नाही तर रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्याने संघाचे नेतृत्व केल्याचेही पाहायला मिळाले होते.  न्यूझीलंड विरुद्ध पुन्हा बुमराहच्या खांद्यावर उप कर्णधाराची धूरा देण्यात आली आहे. यामागचा खास डाव म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील तयारी असावी, असेच दिसून येते. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी  ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात रोहित शर्मा काही सामन्यांना मुकणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे त्यापरिस्थितीत टीम इंडियाची धूरा कोण सांभाळणार हा एक मोठा प्रश्नच होता. ज्याचे उत्तर न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेआधीच मिळाल्याचे दिसते. आगामी दौऱ्यात रोहित शर्मा अनुपस्थितीत राहिला तर जसप्रीत बुमराह कॅप्टन होणार, याचे संकेत बीसीसीआयने न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठीचा संघ जाहीर करताना दिले आहेत.  

न्यूझीलंड विरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप.

राखीव खेळाडू : हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, मयंक यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.

भारत न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्याचे वेळापत्रक 

 

  • पहिला कसोटी सामना - १६ ते २० ऑक्टोबर, २०२४- बंगळुरु 
  • दुसरा कसोटी सामना- २४ ते २८ ऑक्टोबर, २०२४ -  पुणे
  • तिसरा कसोटी सामना ०१ ते ५ नोव्हेंबर, २०२४ - मुंबई

(सर्व सामन्यांची वेळ भारतीय प्रमाण वेळेनुसार, सकाळी ९ वाजून ३० मिनिटे अशी आहे.)

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघरोहित शर्माजसप्रित बुमराह