Join us  

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत रोहित शर्माने केलं 'हे' विधान

रोहित शर्माने महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत एक विधान केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 6:57 PM

Open in App

नवी दिल्ली : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला ट्वेन्टी-20 सामना उद्या खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारताचा हंगामी कर्णधार रोहित शर्मानेमहेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत एक विधान केलं आहे.

धोनीच्या निवृत्तीचा क्षण जवळ आल्याचे क्रिकेट वर्तुळात म्हटले जात आहे. धोनीच्या निवृत्तीबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी आपले मत व्यक्त केले आहे. धोनीचे निवृत्तीबाबतचे मत नेमके आहे तरी काय, हे अजून कोणालाही माहिती नाही. 

निवृत्ती पत्करल्यावर काही माजी क्रिकेटपटू समालोचन आणि प्रशिक्षणाकडे वळले आहेत. पण धोनी नेमके काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल. धोनीने आपल्या भविष्याबाबत एक प्लॅन तयार केला आहे. या प्लॅननुसार त्याने काही गोष्टीही केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी धोनी हा झारखंडच्या संघाला मार्गदर्शन करणार, असे वृत्त आले होते. पण या वृत्ताचे बऱ्याच जणांनी खंडन केले आहे. धोनी निवृत्तीनंतर आपल्या क्रिकेट अकादमीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे समजते. युवा खेळाडूंना चांगले प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळावे, यासाठी धोनीने अकादमी सुरु केली आहे. धोनीने आतापर्यंत नागपूर, इंदूर, पटणा, वाराणसी आणइ बोकारो येथे अकादमी सुरु केली आहे. भारताबाहेरही धोनीची अकादमी कार्यरत आहे. दुबईमध्ये धोनीच्या अकादमीची शाखा आहे.आता धोनीला आपल्या शहरात, म्हणजेच रांचीमध्ये अकादमी उभारायची आहे.

रोहित पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत होता. यावेळी धोनीच्या निवृत्तीविषयी विचारल्यावर रोहित म्हणाला की, " धोनीच्या निवृत्तीची सध्या चर्चा नाही. तुम्हीच या गोष्टी प्रकाशझोतात आणत आहात. ही गोष्ट ड्रेसिंगरुमध्ये बाहेरचा आहे."

भारताचा हंगामी कर्णधार रोहित शर्माला सराव करताना दुखापत झाल्याचे वृत्त होते. दुखापतीनंतर रोहितने लगेचच मैदान सोडल्याचेही समोर आली होती. आता रोहितच्या दुखापतीवर मोठं अपडेट समोर आलं आहे. रोहित पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात खेळणार की नाही, हे या अपटेडमधूनच कळू शकणार आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यामधील पहिला ट्वेन्टी-20 सामना नवी दिल्लीला होणार आहे. या सामन्याच्या सरावासाठी भारतीय संघ आज मैदानात उतरला होता. पण यावेळी सराव करताना रोहितला दुखापत झाली होती.

रोहित नेट्समध्ये सराव करत होता. तेव्हा एक चेंडू त्याच्या डाव्या मांडीवर आदळला. हा फटका एवढा जोरदार होता की, रोहितने तिथून बाहेर पडणे उचित समजले. त्यानंतर रोहितने दुखापतीवर बर्फ लावला. ही दुखापत कमी होत नसल्याने त्याने थेट मैदान सोडले. ही दुखापत किती गंभीर स्वरुपाची आहे, हे अजून समजू शकलेले नाही.

रोहितला दुखापत झाली असली तरी तो आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. त्याचबरोबर तो बांगलादेशबरोबरचा पहिला सामना खेळणार आहे.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीरोहित शर्माभारत विरुद्ध बांगलादेश