Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2022 MI vs PBKS Live: रोहित शर्माचा 'मास्टरप्लॅन'; मुंबई इंडियन्सच्या संघात रमणदीपच्या जागी अनुभवी परदेशी खेळाडूला दिली संधी

मुंबईने टॉस जिंकून पंजाबला दिली प्रथम फलंदाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 07:24 PM2022-04-13T19:24:55+5:302022-04-13T19:25:31+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma Master Plan for Mumbai Indians Playing XI IPL 2022 MI vs PBKS MI wins toss Punjab Kings batting first | Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2022 MI vs PBKS Live: रोहित शर्माचा 'मास्टरप्लॅन'; मुंबई इंडियन्सच्या संघात रमणदीपच्या जागी अनुभवी परदेशी खेळाडूला दिली संधी

Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2022 MI vs PBKS Live: रोहित शर्माचा 'मास्टरप्लॅन'; मुंबई इंडियन्सच्या संघात रमणदीपच्या जागी अनुभवी परदेशी खेळाडूला दिली संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2022 MI vs PBKS Live: मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलग चार सामन्यात पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ सध्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे आजचा सामना मुंबईच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाने एक मास्टरप्लॅन केला आहे. मुंबईच्या संघात फलंदाजाच्या जागी एका अतिरिक्त गोलंदाजाला संधी देण्यात आली आहे. गेल्या सामन्यात रमणदीप सिंगला संघात फलंदाज म्हणून खेळवण्यात आले होते. पण या सामन्यात त्याच्या जागी टायमल मिल्सला संघात स्थान देण्यात आले आहे. पंजाबचा संघदेखील मागचा सामना पराभूत झाला होता. पण त्यांनी संघात एकही बदल केलेला नाही.

मुंबई इंडियन्स संघ:रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (किपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थंपी

पंजाब किंग्ज संघ: मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो (किपर), लियम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, शाहरुख खान, कगिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग

Web Title: Rohit Sharma Master Plan for Mumbai Indians Playing XI IPL 2022 MI vs PBKS MI wins toss Punjab Kings batting first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.