मागील काही वर्षांत भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसचे महत्त्व वाढलेले पाहायला मिळतेय आणि याचे श्रेय माजी कर्णधार विराट कोहलीला दिले जाते. विराटने स्वतः फिटनेसचा एक आदर्श इतरांसमोर ठेवला आणि त्यामुळे अन्य खेळाडू प्रेरित झाले. त्यामुळेच भारतीय संघ निवडीसाठी yo-yo test अनिवार्य झाली. पण, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्या वाढलेल्या ढेरीवरून सातत्याने टीका होताना दिसली आणि अजूनही ती होतच आहे. रोहितच्या या लठ्ठपणावर भारतीय संघाचे स्ट्रेंथ व कंडीशनिंग प्रशिक्षक अंकित कालियार यांनी स्पष्ट मत मांडले.
प्रशिक्षकांनी हेही मान्य केले की, कोहलीने फिटनेसची व्याख्या बदलली आणि संघात फिटनेस संस्कृती निर्माण केली. ''जेव्हा फिटनेसचा विषय येतो तेव्हा विराट हा आदर्श उदाहरण डोळ्यासमोर उभा राहतो. संघात त्याने फिटनेस कल्चर तयार केले. जेव्हा संघातील प्रमुख खेळाडूच तंदुरुस्त असतो, त्याने इतरांना प्रेरणा मिळते. त्याने इतरांमध्ये आत्मविश्वास निर्माण केले,''असेही अंकित यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, तो जेव्हा कर्णधार होता, तेव्हा संघातील सर्व खेळाडू तंदुरुस्त राहतील याची त्याने काळजी घेतली. फिटनेस हा त्याने अव्वल मापदंड संघात ठेवला होता. त्याने ते कल्चर व शिस्त संघात तयार केले. त्याने जे वातावरण निर्माण केले, ते उल्लेखनीय होते. भारतीय खेळाडू इतके फिट होण्यामागे विराट हेच कारण आहे.
विराटमुळे युवा पिढीला प्रेरणा मिळाली आणि शुबमन गिल हे ताजे उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले. ''रोहित शर्मा हा तंदुरुस्त खेळाडू आहे. त्याचा फिटनेस चांगला आहे. तो थोडा लठ्ठ दिसतो, परंतु नेहमी यो-यो टेस्ट पास करतो. विराट कोहलीइतकाच तो फिट आहे. तो लठ्ठ जरी दिसत असला तरी त्याचे क्षेत्ररक्षण आपण पाहिले आहे. त्याची चपळता अविश्वसनीय आहे. तंदुरुस्त क्रिकेटपटूंपैकी तो एक आहे, '' असे अंकित यांनी टाईम्स ऑफ इंडियासोबत बोलताना म्हटले.
Web Title: ‘Rohit Sharma may look bulky, but is as fit as Virat Kohli’, says India’s strength and conditioning coach Ankit Kaliyar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.