हार्दिक पांड्याचे T20 WC खेळणे अवघड? रोहितने घेतली द्रविड, आगरकर यांची भेट; ठेवली एक अट

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ नंतर काही दिवसांत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सुरू होणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 03:29 PM2024-04-16T15:29:06+5:302024-04-16T15:29:35+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma meets Rahul Dravid & Ajit Agarkar, Hardik Pandya's fate for ICC T20 World Cup hangs in balance over his bowling, shivam dube in contention | हार्दिक पांड्याचे T20 WC खेळणे अवघड? रोहितने घेतली द्रविड, आगरकर यांची भेट; ठेवली एक अट

हार्दिक पांड्याचे T20 WC खेळणे अवघड? रोहितने घेतली द्रविड, आगरकर यांची भेट; ठेवली एक अट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ नंतर काही दिवसांत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सुरू होणार आहे. त्यामुळेच IPL 2024 मधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समिती लक्ष ठेवून आहेत. हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यापासून त्याच्यावर टीका होतच आहे, त्याचा परिणाम त्याच्या कामगिरीवर जाणवतोय. २०२३ मध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील दुखापतीनंतर हार्दिकने थेट आयपीएल २०२४ मधून पुनरागमन केले आहे. त्याचे सर्व लक्ष T20 World Cup स्पर्धेतून भारतीय संघात पुनरागमन करण्यावर आहे, परंतु त्याबाबत एक मोठी घडामोड समोर येत आहे.


T20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी हार्दिकचे भारतीय संघात पुनरागमन हे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये तो कितीवेळा आणि कशी गोलंदाजी करतो यावर अवलंबून असेल. मागील आठवड्यात मुंबईतील BCCI च्या मुख्यालयात भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात बैठक झाली. या बैठकीत हार्दिकला पुनरागमन करायचे असल्यास त्याला नियमित गोलंदाजी करावी लागेल, असा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार दोन तास चाललेल्या बैठकीतील चर्चेचा मुख्य मुद्दा हा जलदगती गोलंदाज-अष्टपैलू खेळाडूबद्दल होता, ज्याचा संघाला अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत मदत मिळेल.


आयपीएलमध्ये पुनरागमन केल्यापासून पांड्याने सहापैकी चार सामन्यांमध्ये गोलंदाजी केली आहे. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने गोलंदाजी केली. त्यानंतर पुढच्या दोन सामन्यांमध्ये गोलंदाजी न करणाऱ्या हार्दिकने रॉयल चॅलेंजर्स आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध गोलंदाजी केली. CSK विरुद्ध शेवटच्या षटकात महेंद्रसिंग धोनीने त्याची धुलाई केली. त्याने १२च्या सरासरीने धावा दिल्या आहेत आणइ फक्त ३ विकेट्स घेतल्या आहेत.

शिवम दुबेवर निवड समितीचे लक्ष...
पांड्याला फलंदाजीत केवळ १३१ धावा करता आल्या असल्याने निवड समिती शिवम दुबेचा विचार करत आहे. त्याने CSK कडून चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळतेय. 
 

Web Title: Rohit Sharma meets Rahul Dravid & Ajit Agarkar, Hardik Pandya's fate for ICC T20 World Cup hangs in balance over his bowling, shivam dube in contention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.