Ruturaj Gaikwad Rohit Sharma, Mumbai Indians : IPL 2023 Playoffs चा पहिला क्वालिफायर सामना झाला. आता चेन्नईतील एलिमिनेटर सामन्याची वेळ आहे. आज रोहित शर्माच्यामुंबई इंडियन्सला क्रुणाल पांड्याच्या लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान असेल. पण हे आव्हान पेलण्याआधी ऋतुराज गायकवाड खेळपट्टीबद्दल जे बोलला त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे त्याने केलेल्या विधानामुळे रोहित शर्माचे टेन्शन नक्कीच वाढेल असेही बोलले जात आहे.
पहिल्या क्वालिफायरमधील विजयानंतर ऋतुराज गायकवाडने ज्या गोष्टी सांगितल्या त्यावरून खेळपट्टीच्या परिस्थितीचा अंदाज आला. सीएसकेच्या सलामीवीराच्या मते, चेन्नईची खेळपट्टी ३-४ सामन्यांपर्यंत वेगळी होती आणि आता खूपच वेगळी आहे. चेन्नईच्या खेळपट्टीवर गुजरात टायटन्सविरुद्ध ६० धावांची खेळी केल्यानंतर समाधानी दिसणारा ऋतुराज म्हणाला, “चेन्नईतील शेवटचे ३-४ सामने पूर्णपणे वेगळे होते. यादरम्यान असे दिसून आले आहे जे सुरुवातीच्या सामन्यांमध्ये येथे दिसले होते ते आता दिसत नाही. इथली सुरुवातीच्या सामन्यासाठीची खेळपट्टी चांगली होती. पण आता जी खेळपट्टी दिसत आहे, तिची वागणूक वेगळी आहे. त्यामुळे इथे सुरूवातीच्या टप्प्यात खेळलेल्या संघांना आता अचानक सामना खेळताना फलंदाजांना अडचणी येऊ शकतात"
रोहित शर्माला खेळपट्टी नीट पाहावी लागणार!
चेन्नई हे आयपीएलमध्ये सीएसकेचे होम ग्राउंड असल्याने त्यांनी त्यांचा सामना जिंकून अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघाने सुरूवातीच्या काळात चेपॉकवर सामना खेळला. तर लखनौने दुसऱ्या टप्प्यात चेपॉकवर सामना खेळला होता. त्यामुळे रोहित शर्माला आणि मुंबईच्या फलंदाजांना मैदानावर उतरल्यावर खेळपट्टी नीट समजून घ्यावी लागणार आहे.
धोनीही खेळपट्टी वाचायला दोन वेळा चुकला!
अडचण खेळपट्टीच्या स्वभावासह परिस्थिती समजून घेण्याचीही आहे. कारण CSKचा कर्णधार एमएस धोनीची स्वत:च्या खेळपट्टीवर याबाबत फसवणूक झाली होती. ज्या चेन्नईच्या खेळपट्टीवर पहिला क्वालिफायर खेळला गेला होता, तेथे धोनीला प्रथम फलंदाजी करायची होती कारण नंतर त्याच्या मते दव वाढले असते. पण दव पडलेच नाही आणि त्यामुळे तो नाणेफेक हरलेच ते बरे, असे तेच म्हणाला. त्याचप्रमाणे CSKने पंजाब किंग्ज विरुद्ध या खेळपट्टीवर पहिला सामना खेळला तेव्हा धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. दव पडणार नाही असे त्यांना वाटत होते. पण त्या सामन्यादरम्यान दव पडले आणि CSK 200 धावा करूनही सामना गमावला.