Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला

Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test Day 1 Live Updates: आजपासून भारत विरूद्ध बांगलादेश दुसऱ्या कसोटीला सुरुवात झाली. पावसामुळे पहिल्या दिवशी केवळ ३५ षटकांचाच खेळ झाला. त्या खेळात भारतीय गोलंदाजांना अपेक्षित चमक दाखवता आला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 08:44 PM2024-09-27T20:44:42+5:302024-09-27T20:46:41+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma needs to be shown this stats about Ravindra Sharma said Mumbaikar Sanjay Manjrekar IND vs BAN 2nd Test Day 1 Live Updates | Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला

Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test Day 1 Live Updates: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पावसाने वाया गेला. कसोटीच्या पहिल्या दिवशी केवळ ३५ षटकांचाच खेळ होऊ शकला. त्यात बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करताना ३ गडी गमावून १०७ धावा केल्या. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण कर्णधार रोहित शर्माची ही चाल फारशी यशस्वी ठरली नाही. भारतीय संघाला अपेक्षित असलेली मदत वेगवान गोलंदाजांना मिळाली नाही. तशातच रवींद्र जाडेजा ( Ravindra Jadeja ) याच्याबाबत मुद्दा अधोरेखित करत प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर ( Sanjay Manjrekar ) रोहित शर्माच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले.

कर्णधार रोहितने आज ३५ षटकांच्या खेळात चार गोलंदाजांचा वापर केला. त्यात ती वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज आणि त्यांच्यानंतर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांचा समावेश होता. आकाश दीपने २ विकेट्स घेतल्या, तर अनुभवी अश्विनने एक बळी टिपला. पण रोहितने फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजाला एकही षटक टाकायला दिले नाही. याच मुद्द्याकडे संजय मांजरेकर यांनी लक्ष वेधले. संजय मांजरेकरने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर मुद्दा मांडला. "जाडेजा विरूद्ध अलिस्टर कूक, २०१६ टेस्ट मालिका: ८ डावांमध्ये जाडेजाने त्याला ६ वेळा बाद केले आणि केवळ ७५ धावा दिल्या. बांगलादेशचे डावखुरे सलामीवीर क्रीजवर असताना आज रोहितने जाडेजाला लवकर गोलंदाजी दिली नाही. रोहितला ही आकडेवारी दाखवली जायला हवी," असे मांजरेकर यांनी नमूद केले.

दरम्यान, आज पावसामुळे उशिरा सुरु झालेल्या कसोटीत रोहितने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर झाकीर हसन २४ चेंडू खेळला, पण भोपळाही न फोडता माघारी परतला. दुसरा सलामीवीर शादमान इस्लाम ३६ चेंडूत २४ धावा काढून बाद झाला. दोघांनाही आकाश दीपने बाद केले. कर्णधार नजमुल होसेन शान्तो याला चांगली सुरुवात मिळाली होती. पण अश्विनने त्याला ५७ चेंडूत ३१ धावांवर माघारी धाडली. पावसामुळे ३५ षटकांनंतर खेळ थांबला तेव्हा बांगलादेशचा मोमिनुल हक नाबाद ४० तर अनुभवी मुश्फिकूर रहिम नाबाद ६ धावांवर खेळत होते.

 

Web Title: Rohit Sharma needs to be shown this stats about Ravindra Sharma said Mumbaikar Sanjay Manjrekar IND vs BAN 2nd Test Day 1 Live Updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.