Rohit Sharma Nita Ambani Mumbai Indians Viral Video, IPL 2025 MI vs KKR: सलामीचे दोन सामने हरल्यानंतर अखेर मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा विजय मिळाला. कोलकाता विरूद्ध झालेल्या सामन्यात मुंबईने ८ विकेट्स राखून दमदार विजयी कमबॅक केले. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना केवळ ११६ धावा केल्या. पदार्पणाच्या सामन्यात मुंबईचा गोलंदाज अश्वनी कुमारने ४ बळी घेत KKR ला दणका दिला. त्यानंतर मुंबईच्या संघाने १२.५ षटकांत आव्हान पार केले. वानखेडेवर मुंबईचा पहिलाच सामना होता, त्यामुळे रोहित शर्माकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो केवळ १३ धावा काढून बाद झाला. सलग तिसऱ्या सामन्यात रोहित अपयशी ठरल्यानंतर त्याच्यावर टीका करण्यात येत आहे. तशातच आता संघमालकीण निता अंबानी आणि रोहित शर्मा यांचा एका व्हायरल झालेल्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
नेमका काय घडला प्रकार?
रोहित शर्मासाठी IPL 2025 अजून तरी फारसे खास राहिलेले नाही. पहिल्या तीनही सामन्यांत तो फ्लॉप ठरला. वानखेडे मैदानावरही त्याला आपली दमदार फलंदाजी दाखवता आली नाही. सामना संपल्यानंतर संघमालकीण नीता अंबानी त्याच्याशी बराच वेळ गप्पा मारताना दिसल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता एखाद्या गंभीर विषयावर ही चर्चा सुरू असल्याचा अंदाज बांधला जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्या व्हि़डीओमध्ये नीता अंबानी यांनी रोहित शर्माकडे दुर्लक्ष केल्याचा दावा काहींनी केला आहे. तसा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाहा व्हायरल व्हिडीओ-
रोहित-नीता अंबानी व्हिडीओचे सत्य काय?
भरमैदानात रोहित शर्मा आणि नीता अंबानी दोघे चर्चा करत होते. ही चर्चा सुरु असताना, नीता अंबानींशी बोलण्यासाठी दुसरे कुणीतरी आले. त्या अचानक त्यांच्या दिशेने वळल्या. त्यामुळे रोहित बोलायचा थांबला आणि त्यांची चर्चा संपण्याची वाट पाहिली. व्हिडीओ नीट पाहिल्यावर हे स्पष्ट दिसते की नीता अंबानी यांनी रोहितकडे दुर्लक्ष केलेले नाही. पण सोशल मीडियावर मात्र व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
Web Title: Rohit Sharma Nita Ambani viral video intense conversation sparks debate after Mumbai Indians win IPL 2025 MI vs KKR
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.