आता रोहित शर्मा टी-20 फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना दिसणार नाही, हे ऐकून भारतीय क्रिकेट चाहत्यांना नक्कीच धक्का बसेल. खरे तर, रोहितने एकदिवसीय विश्वचषक-2023 सुरू होण्यापूर्वीच छोट्या फॉर्मेटमधील आपल्या भविष्यासंदर्भात भाष्य केले होते, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिली आहे.
भारताचा वनडे आणि टेस्ट टीमचा कर्णधार रोहित शर्मा आता टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत खेळण्याची शक्यता नाही. 50 षटकांच्या विश्वचषकाला (ODI World Cup-2023) सुरुवात होण्यापूर्वीच रोहित शर्माने टी-20 फॉरमॅटमधील आपल्या भविष्यासंदर्भात चर्चा केली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली होती. नोव्हेंबर 2022 मध्ये भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्यानंतर, रोहितने या फॉरमॅटमध्ये एकही सामना खेळलेला नाही. तेव्हापासून बहुतेकवेळा हार्दिक पांड्यानेच (Hardik Pandya) भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. रोहितने आतापर्यंत 148 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने 4 शतकांसह 140 च्या स्ट्राइक रेटने 3853 धावा ठोकल्या आहेत.
अगरकरसोबत केली होती चर्चा -
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, ‘ही काही नवी गोष्ट नाही. रोहित शर्माने गेल्या एक वर्षापासून कुठलाही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. कारण त्याने त्याचे लक्ष वनडे वर्ल्ड कपवर केंद्रित केले होते. यासंदर्भात त्याने चीफ सिलेक्टर अजीत अगरकरसोबतही गहन चर्चा केली होती. रोहितने स्वतःच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून दूर राहण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केली होती. हा पूर्णपणे रोहित शर्माचा निर्णय आहे.’
Web Title: Rohit Sharma now doubtful to play in T20 format BCCI hinted
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.