Join us

WTC: अजब योगायोग! फायनलसाठी मैदानात येताच रोहित-कमिन्स करणार समान विक्रम

दोन्ही कर्णधार एकाच सामन्यात समान पराक्रम करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 14:59 IST

Open in App

Rohit Sharma Pat Cummins, WTC Final 2023: दोन्ही संघांच्या कर्णधारांनी एकाच सामन्यात आपल्या नावावर एकच कामगिरी केल्याचे क्वचितच घडते. असेच काहीसे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पाहायला मिळणार आहे. रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स मैदानात उतरताच त्यांच्या नावावर मोठी कामगिरी नोंदवली जाईल. दोन्ही कर्णधार एकच विक्रम करताना दिसणार आहेत.

ही कामगिरी त्यांच्याशी संबंधित एका खास गोष्टीबाबतच्या विक्रमाची असणार आहे. टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान लंडनच्या ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी १२ जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेत रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स हे दोघे मोठी आणि समान कामगिरी करणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारांशी संबंधित हा विक्रम त्यांच्या कसोटी सामन्याशी संबंधित आहे. WTC अंतिम सामना रोहित आणि कमिन्स या दोघांच्या कारकिर्दीतील 50 वा कसोटी सामना असेल. असा पराक्रम एकाच सामन्यात घडण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल.

रोहित शर्मा vs पॅट कमिन्स

आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 49 कसोटींमध्ये पॅट कमिन्सने 217 विकेट घेण्याव्यतिरिक्त 924 धावा केल्या आहेत. तर, रोहित शर्माने तितक्याच कसोटी सामन्यांमध्ये 3379 धावा केल्या आहेत आणि 2 विकेट्स घेतल्या आहेत. रोहितच्या नावावर फलंदाजीत 1 द्विशतक, 9 शतके आणि 14 अर्धशतके आहेत. कमिन्सला रोहितपेक्षा कर्णधारपदाचा दुप्पट अनुभव आहे. रोहितने आतापर्यंत 6 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. ज्यात त्याने 4 जिंकले आहेत, 1 गमावला आहे आणि 1 अनिर्णित खेळला आहे. दुसरीकडे, पॅट कमिन्सने आत्तापर्यंत 15 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे, ज्यात त्याने 8 जिंकले आहेत, 3 गमावले आहेत आणि 4 अनिर्णित खेळले आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया
Open in App