शाळेची फी भरायला नव्हते पैसे, तो मुलगा ‘खेलरत्न’ पुरस्काराचा मानकरी ठरला; प्रशिक्षक दिनेश लाड यांनी केलं कौतुक

रोहित शर्माची देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार ‘खेलरत्न’साठी शिफारस झाली आणि प्रशिक्षक दिनेश लाड यांचे अनेकांनी अभिनंदन केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 06:26 PM2020-08-18T18:26:47+5:302020-08-18T18:27:30+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma picked for Rajiv Gandhi Khel Ratna award, coach Dinesh Lad congratulate him | शाळेची फी भरायला नव्हते पैसे, तो मुलगा ‘खेलरत्न’ पुरस्काराचा मानकरी ठरला; प्रशिक्षक दिनेश लाड यांनी केलं कौतुक

शाळेची फी भरायला नव्हते पैसे, तो मुलगा ‘खेलरत्न’ पुरस्काराचा मानकरी ठरला; प्रशिक्षक दिनेश लाड यांनी केलं कौतुक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- रोहित नाईक  
मुंबई : ‘मला रोहितचे खूप कौतुक वाटते. ज्या मुलाकडे कधी शाळेची फी भरण्याइतपत पैसे नव्हते, तोच मुलगा आज ‘खेलरत्न’ पुरस्काराचा मानकरी ठरला. अजून काय हवंय एका प्रशिक्षकाला?’ अशा शब्दांत ‘हिटमॅन’ रोहित शर्माला घडविणारे त्याचे शालेय प्रशिक्षक दिनेश लाड यांनी ‘लोकमत’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या.

IPL 2020 : टायटल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत पोल पोझिशनवर असलेले 'टाटा सन्स'चं नेमकं काय चुकलं? 

मंगळवारी रोहित शर्माची देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार ‘खेलरत्न’साठी शिफारस झाली आणि लाड यांचे अनेकांनी अभिनंदन केले. केवळ १२ चेंडू टाकणाºया चिमुकल्या मुलाची गुणवत्ता हेरणाºया लाड यांचा हाच विद्यार्थी आता ‘खेलरत्न’ बनणार आहे. लाड यांनी सांगितले की, ‘यशस्वी होण्यासाठी पैसा लागत नाही, तर गुणवत्ता लागते. रोहितकडे गुणवत्ता ठासून भरलेली आहे. ज्या मुलाकडे शाळेची फी भरायला पैसे नव्हते, आज तोच मुलगा खेलरत्न मिळवतोय. हे सर्व त्याने त्याच्या गुणवत्तेच्या जोरावर मिळवले आहे.’

किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखाली संघ मैदानावर उतरणार; थोड्यावेळात ट्वेंटी-20चा थरार सुरू होणार

रोहित आगामी आयपीएलमध्येही यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करताना लाड म्हणाले की, ‘ रोहित आता आयपीएलसाठी सज्ज आहे. कोरोनामुळे मोठी विश्रांती मिळाली असली तरी तो अपेक्षित कामगिरी करण्यात यशस्वी होईल. कारण त्याच्या नसानसांत क्रिकेट भिनलेले आहे. तो यशस्वी होईल यात शंका नाही.’

आता विश्वचषक जिंकावे...
लाड यांनी यावेळी एक गुरू म्हणून रोहितने देशासाठी विश्वचषक जिंकावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. ते म्हणाले, ‘भविष्यात रोहित कामगिरीत सातत्या राखेल यात शंका नाही. काही दिवसांपूर्वीच धोनीने निवृत्ती घेतली. त्याने देशाला दोन विश्वचषक मिळवून दिले आहेत. त्यामुळे मलाही एक प्रशिक्षक म्हणून वाटतंय की, रोहितने ५० षटकांचा विश्वचषक जिंकावा आणि त्यानंतरच त्याने निवृत्त व्हावे.

BREAKING: टाटा सन्स, बायजूला मागे सारून 'ड्रीम 11' झाले IPL 2020 चे स्पॉन्सर, मोजले 222 कोटी

Rajiv Gandhi Khel Ratna award : रोहित शर्मा, विनेश फोगाट यांच्यासह चौघांना मिळणार पुरस्कार

पुरस्कार ते तिरस्कार; क्रिकेटवीरांना 'अपमानाचा नारळ' द्यायचं BCCI चं धोरण बरं नव्हं! 

हार्दिक पांड्याने जाहीर केलं मुलाचं नाव; बघा या फोटोत तुम्हाला सापडतंय का?

 

Web Title: Rohit Sharma picked for Rajiv Gandhi Khel Ratna award, coach Dinesh Lad congratulate him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.