Rohit Sharma creates history at Wimbledon:केवळ टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने नुकताच संघाला T20 World Cup ची ट्रॉफी जिंकून दिली. या भव्यदिव्य यशानंतर रोहित शर्माला काही काळ विश्रांती मिळाली. या सुटीचा सदुपयोग करताना रोहितने प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेला हजेरी लावली. रोहितने विम्बल्डन सेंटर कोर्टवर रॉयल बॉक्समध्ये हजेरी लावली. डॅनिल मेदवेदेव आणि कार्लोस अल्कराज यांच्यातील पहिल्या उपांत्य फेरीचा सामना पाहण्यासाठी तो पोहोचला होता. यावेळी मैदानात न उतरताही रोहित शर्माने इतिहास रचला.
हॉलिवूड स्टार टॉम क्रूझ, टेनिस दिग्गज रॉजर फेडरर आणि लिटल मास्टर सचिन तेंडुलकर यांसारख्या दिग्गजांनी हजेरी लावलेल्या रॉयल बॉक्समध्ये रोहित शर्माने आपली उपस्थिती लावली आणि सामन्याचा आनंद घेतला. रोहितने ऑलिव्ह सूट आणि लालसर रंगाता टाय घातला होता. विम्बल्डनच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून T20 विश्वचषक विजेत्या कर्णधाराचे स्वागत करणारी पोस्ट करण्यात आली होती. 'रोहित शर्मा, विम्बल्डनमध्ये आपले स्वागत आहे', अशा आशयाची ती पोस्ट होती. या पोस्टच्या माध्यमातून रोहितने नवा विक्रम केला. पाहा ती पोस्ट-
विम्बल्डनच्या मैदानातही रोहित नावाप्रमाणे 'हिट'मॅन ठरला. विम्बल्डनने कर्णधाराच्या स्वागतासाठी केलेल्या पोस्टने ४.४ मिलियन लाइक्सचा टप्पा ओलांडला. रोहित शर्मासंबंधित पोस्ट ही या संपूर्ण हंगामातील सर्वाधिक पसंतीची पोस्ट बनली. विम्बल्डन विजेत्या कार्लोस अल्कराजच्या विजयाच्या पोस्टपेक्षाही या पोस्टला अधिक प्रतिक्रिया (एंगेजमेंट्स) मिळाल्या.