Join us  

Rohit Sharma press conference Live : Ajinkya Rahane, चेतेश्वर पुजारा यांच्यासाठी संघाचे दरवाजे बंद?; कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितले... 

Rohit Sharma press conference LIVE - वन डे आणि ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पूर्णवेळ कर्णधार म्हणून आतापर्यंत यशस्वी ठरलेला रोहित शर्मा उद्या कसोटी कर्णधार म्हणून प्रथमच मैदानावर उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 2:01 PM

Open in App

India vs Sri Lanka, Test Series Live , Rohit Sharma press conference LIVE - वन डे आणि ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पूर्णवेळ कर्णधार म्हणून आतापर्यंत यशस्वी ठरलेला रोहित शर्मा उद्या कसोटी कर्णधार म्हणून प्रथमच मैदानावर उतरणार आहे. भारत-श्रीलंका यांच्यातल्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून सुरूवात होत आहे आणि त्याआधी रोहितने आज पत्रकार परिषद घेतली. मोहाली येथे होणारी ही कसोटी माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kolhi) याची १०० वी कसोटी आहे आणि त्याबाबतही रोहितने त्याचे मत व्यक्त केले. शिवाय प्रथमच अजिंक्य रहाणे  व चेतेश्वर पुजारा ( Ajinkya Rahane & Cheteshwar Pujara ) यांच्याशिवाय भारतीय संघ कसोटी सामना खेळणार आहे. रहाणे व पुजारा यांच्या भविष्याबाबत मतमतांतर असताना रोहितने आज स्पष्ट संकेत दिले.

विराट कोहलीची १०० वी कसोटी 

  • हा अविस्मरणीय प्रवास आहे आणि तितकाच दीर्घ प्रवास आहे. क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये त्याने अविश्वसनीय कामगिरी केली आहे. त्याला कसोटी क्रिकेट खेळताना पाहणे, नेहमी सुखावणारे आहे. त्याची ही कसोटी आम्ही खास बनवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आशा करूयात की कसोटीचे पाच दिवस आमच्यासाठी चांगले जातील, असे रोहित म्हणाला. 
  • त्याने पुढे सांगितले की,ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका विजय अविस्मरणीय होता आणि तो विराटच्या नेतृत्वाखाली मिळवला. २०१३मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झळकावलेले शतक हे दर्जेदार होते. त्या खेळपट्टीवर खेळणे आव्हानात्मक होते आणि डेल स्टेनसारख्या गोलंदाजाचा सामना करणे सोपे नव्हते.  

 

अजिंक्य-चेतेश्वर बद्दल...

  • उद्याच्या सामन्यात अंतिम ११ मध्ये कोण असेल हे मी आता सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला उद्यापर्यंत वाट पाहावी लागेल. पण, जो कुणी तिसऱ्या व पाचव्या क्रमांकासाठी संघात खेळेल, त्यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. या दोन क्रमांकावर अजिंक्य रहाणेचेतेश्वर पुजारा यांचे योगदान अमुल्य आहे. त्यामुळे अजूनही त्यांचा कसोटी क्रिकेटसाठी विचार केला जाईल. भविष्यात रहाणे व पुजाराचा विचारच केला जाणार नाही, असे कुठे लिहिलेले नाही. त्यांच्या कामगिरीवर आमचे लक्ष आहे. भारताला नंबर १ बनवण्यात या दोघांनीही मोठा वाटा उचलला आहे. त्यांचे अथक परिश्रम व योगदान याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही.
टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारोहित शर्माअजिंक्य रहाणेचेतेश्वर पुजारा
Open in App