Rohit Sharma Dinesh Karthik Video: दक्षिण आफ्रिकेने उभा केलेला २२७ धावांचा डोंगर सर करताना भारताला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. रिषभ पंत व दिनेश कार्तिक यांनी धावांचा वेग वाढवायचा प्रयत्न केला. पण त्यांना मोठी खेळी करणे जमले नाही. विराट कोहली व लोकेश राहुल यांच्या अनुपस्थितीत भारताच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली आणि ४९ धावांनी पराभव पदरी आला. दक्षिण आफ्रिकेकडून रॅली रुसोने ४८ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या. याशिवाय क्विंटन डी कॉकनेही अर्धशतक (६८) ठोकले. प्रत्युत्तरात दिनेश कार्तिकने सर्वाधिक ४६ धावा केल्या. पण सध्या कार्तिक एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.
टीम इंडियासोबत तिसऱ्या टी२० मध्ये जे घडलं, ते साऱ्यांनीच पाहिले. इंदोरमध्ये झालेल्या शेवटच्या टी२० सामन्यात भारताचा ४९ धावांनी पराभव झाला. पण, या पराभवानंतर टीम इंडियाच्या डगआऊटमध्ये जे पाहायला मिळाले ते फारच वेगळं होते. भारतीय संघाचा पराभूत झाला. त्यानंतर दिनेश कार्तिक टाळ्या वाजवत उठला आणि रोहितशी काहीतरी बोलला. त्यानंतर रोहितलाही हसू आवरलं नाही. त्याने अतिशय मजेशीर पद्धतीने दिनेश कार्तिकच्या पाठीत हळूच ठोसा मारला. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे.
कार्तिकने वाजवल्या टाळ्या, रोहितने मारला ठोसा (Video)-
रोहित आणि दिनेश कार्तिक हे दोघे फार जुने सहकारी आहेत. त्यामुळे काल कोहली आणि लोकेश राहुल नसताना, रोहितच्या पाठोपाठ दिनेश कार्तिक सामना संपल्यानंतर उठला आणि मैदानात हस्तांदोलन करण्यासाठी कूच करताना दिसला. त्यावेळी दिनेश कार्तिकने रोहितची काही तरी बोलून टिंगल केली. त्यानंतर रोहितनेही मजेत त्याच्या पाठीवर ठोसा लगावला. बीसीसीआयने आणखी एक व्हिडिओदेखील शेअर केला, ज्यामध्ये दिनेश कार्तिक आणि रोहित शर्मा सामन्यानंतर पुन्हा एकदा हसताना आणि धमाल-मस्ती करताना दिसले.
दरम्यान, भारताचा टी२० विश्वचषकाआधी हा शेवटचा टी२० सामना होता. अशा वेळी भारताच्या गोलंदाजीतील सर्वात मोठा कमकुवतपणा दक्षिण आफ्रिकेने उघड केला. त्यामुळे आता विश्वचषक सुरू होण्याआधी रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांना काही गोष्टी कराव्या लागणार आहेत.
Web Title: Rohit Sharma punches Dinesh Karthik after he Claps on Team India Lost to South Africa in 3rd T20
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.