Join us  

रोहित शर्मा भूषवणार भारताचे कर्णधारपद; मग विराट कोहलीचे काय होणार...

दमदार कामगिरीनंतर बीसीसीआयला रोहितला एक मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये आहे. रोहित शर्माला आता भारतीय संघाच कर्णधारपद मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 5:19 PM

Open in App

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्माने नेत्रदीपक फलंदाजी केली. या मालिकेतील त्याचे हे तिसरे शतक ठऱले आहे. या दमदार कामगिरीनंतर बीसीसीआयला रोहितला एक मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये आहे. रोहित शर्माला आता भारतीय संघाच कर्णधारपद मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

सध्याच्या घडीला भारताचा कर्णधार विराट कोहली आहे. त्यामुळे तुम्हाला ही बातमी खरी वाटत नसेल. पण निवड समिती सध्याच्या घडीला रोहित शर्माला संघाचे कर्णधारपद देण्याचा विचार करत असल्याचे समजत आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. त्यानंतर कसोटी मालिकाही खेळवण्यात येणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी रोहितकडे संघाचे कर्णधारपद देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. कारण या मालिकेसाठी कोहलीला विश्रांती देण्याचा विचार निवड समिती करत आहे. कोहलीला विश्रांती दिली तर संघाचे कर्णधारपद रोहितकडे सोपवण्यात येऊ शकते.

बांगलादेशचा संघ काही दिवसांमध्ये भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात बांगलादेशचा संघ तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. या स्पर्धेसाठी बांगलादेशचे कर्णधार एका खास खेळाडूला देण्यात आले आहे.

गुरुवारी भारताविरुद्धच्या मालिकेसाठी बांगलादेशच्या पंधरा सदस्यीय खेळाडूंची निवड करण्यात आली. यावेळी संघाचे कर्णधारपद अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनकडे सोपवण्यात आले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यांमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात तीन ट्वेन्टी-20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.बांग्लादेशची टी20 टीम : शाकिब अल हसन (कर्णधार), तमीम इकबाल, लिटन दास, सौम्य सरकार, नईम शेख, मुशफिकर रहीम, महमुदुल्लाह, अफीफ हुसैन, मोसादिक हुसैन, अमिनुल इस्लाम, अराफात सनी, मोहम्मद सैफउद्दीन, अल अमीन हुसैन, मुस्तफिजुर रहमान, सफीउल इस्लाम.

बांगलादेशने भारताला हरवलं; जाणून घ्या वायरल सत्य...भारताचा दक्षिण आफ्रिकेबरोबर तिसरा सामना होणार आहे. भारताचीबांगलादेशबरोबर ट्वेन्टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. पण त्यापूर्वीच बांगलादेशने भारताला हरवलं, असा एक ट्रेंड सुरु झाला आहे. हा ट्रेंड नेमका काय आहे आणि यामागचे वायरल सत्य आहे तरी काय... ते जाणून घेऊया.

भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये फुटबॉलचे दोन सामने खेळवण्यात आले. त्यामध्ये तरी बांगलादेशने भारताला पराभूत केले का, हे पाहिले गेले. पण या दोन सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला होता. त्यामुळे बांगलादेशने या लढतींमध्येही भारतावर विजय मिळवला नाही. मग नक्कीच बांगलादेशचा भारतावर विजय, हे ट्रेंडिंगमध्ये आलं तरी कसं...

स्टार स्पोर्ट्सने सध्या एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ भारत आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेबाबत आहे. या व्हिडीओनंतर आता बांगलादेशने भारताला पराभूत केले, हा ट्रेंड सुरु झाला आहे. पण नेमके हे आहे तरी काय...

या व्हिडीओमध्ये भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि एक कार्टुन दाखवण्यात आले आहे. सेहवाग भारताचे आणि ते कार्टुन बांगलादेशचे प्रतिनिधीत्व करत आहे. या व्हिडीमध्ये एक गेम खेळला जातो. हा गेम चिमणी उड, कावळा उड... या प्रकारचा आहे. या खेळात त्या काट्रुनने विराट कोहली उड, असे म्हटले आणि सेहवागने आपले बोट उचलल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर हा ट्रेंड सुरु झाल्याचे म्हटले गेले आहे.

टॅग्स :रोहित शर्माविराट कोहलीभारतबांगलादेश