ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे सर्व क्रिकेटपटूंना घरीच रहावे लागत आहेइशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा यांनी केली सरावाला सुरुवात
कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आणि खेळाडूंना आपापल्या घरीच थांबावे लागले. पण, आता सर्व खेळाडू पुन्हा मैदानावर परतण्यासाठी उत्सुक आहेत. चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा यांच्यानंतर हिटमॅन रोहित शर्मानंही सरावाला सुरुवात केली आहे. गुरुवारी त्यानं सोशल मीडियावर फोटो शेअर केला. त्यावर त्यानं भावनिक पोस्ट लिहिली आहे.
मार्च महिन्यापासून रोहित कुटुंबीयांसोबत घरीच आहे. न्यूझीलंड दौऱ्यातील ट्वेंटी-20 मालिकेत त्याला दुखापत झाली आणि त्यानंतर त्याला वन डे व कसोटी मालिकेला मुकावे लागले होते. त्यानंतर भारतातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेतही त्याचा समावेश नव्हता. पाच महिन्यांपासून रोहित क्रिकेट सामना खेळलेले नाही. त्यानंतर मैदानावर उतरल्यानंतर रोहित इमोशनल झाला.
केंद्र सरकारानं जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार मुंबई, महाराष्ट्रात अडकलेल्या खेळाडूंना मैदानावर सराव करण्याच मनाई आहे. पालघरमध्ये राहणाऱ्या शार्दूल ठाकूरनं सरावाला सुरुवात केली होती, परंतु बीसीसीआयनं त्याच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर रॉबीन उथप्पा, श्रेयस गोपाळ, वॉशिंग्टन सुंदर आणि अन्य काही खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली.
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून बिग बी होताहेत ट्रोल; 'ते' ट्विट होतंय व्हायरल
पाकिस्तान क्रिकेट मंडळाला वाटतेय भीती; BCCI कडून मागितली लेखी हमी
दिल्ली डेअरडेव्हिल्सनं विराट कोहलीला संघात का घेतलं नाही ? मोठा खुलासा
IPL 2020 साठी BCCIने पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे केली विनंती!
Photo : या सुंदरीनं जिंकलाय जगातील 'सेक्सी' रेफरीचा किताब; फुटबॉलपटूही पडलेत प्रेमात!
Web Title: Rohit Sharma resumes outdoor training, shares post-workout picture
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.