ठळक मुद्देभारतीय संघात रोहित शर्माचं पुनरागमनसिडनी कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणाउमेश यादवच्या जागी नवदीप सैनीला संधी
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठीच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्माचं संघात पुनरागमन झालं असून युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी कसोटी संघात पदार्पण करणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी कसोटी सिडनीमध्ये गुरुवारपासून सुरू होणार आहे. भारतीय संघात रोहित शर्माचे पुनरागमन झाल्यानं मयांक अग्रवालला अंतिम ११ मध्ये स्थान मिळू शकलेलं नाही. रोहित शर्माकडे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मराठमोळ्या अजिंक रहाणेकडे कर्णधारपद कायम राहणार आहे.
उमेश यादव दुखापतग्रस्त असल्याने तिसऱ्या कसोटी भारतीय संघात नवदीप सैनीला संधी मिळाली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे मालिकेत वर्चस्व मिळविण्याच्या दृष्टीने सिडनी कसोटी अतिशय महत्वाची ठरणार आहे.
भारतीय संघ-
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी
Web Title: rohit sharma return Navdeep Sainis debut here is team india playing eleven
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.