भारतीय संघाने वेस्ट इंडिजबरोबरची मालिका दिमाखात जिंकली. वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारताच्या दिग्गज क्रिकेटर्सना विश्रांती देण्यात आली होती. यात नियमित कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश होता. या दौऱ्यासाठी शिखर धवनकडे कर्णधार पदाची धुरा देण्यात आली होती. यानंतर आता रोहित शर्मा संघात परतल्यानंतर अनेक खेळाडू बाहेर जाण्याची शक्यता आहे.
बाहेर होऊ शकतात हे ओपनर -
शुबमन गिलने (Shubman Gill) वेस्ट इंडिज दौऱ्यावर जबरदस्त कामगिरी केली. गिलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ६४ धावा फटकावल्या होत्या. तर दुसऱ्या वनडे सामन्यात ४३ धावांची खेळी केली होती. तब्बल तीन वर्षांनंतर त्याने टीम इंडियात पुनरागमन केले. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. गिलने दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाला जबरदस्त सुरुवात करून दिली आहे. मात्र आता रोहित शर्माचे परत येताच त्याला बाहेर केले जाऊ शकते.
स्टार विकेटकीपरची जागाही धोक्यात -
ईशान किशन (Ishan Kishan) अद्याप टीम इंडियामध्ये आपले स्थान काय करण्यात अयशस्वी ठरला आहे. जेव्हा रोहित शर्मा अथवा केएल राहुल यांपैकी कुण्या एकाला आराम मिळाला, तेव्हा त्याला टीम इंडियात जागा मिळाली. मात्र ते परत येताच, त्याला बाहेर करण्यात आले. ईशान किशन हाही एक प्रतिभावान क्रिकेटर आहे.
रोहित शर्मा खतरनाक फलंदाज -
जगातील सर्वात खतरनाक फलंदाजांमध्ये रोहित शर्माचा (Rohit Sharma) समावेश होतो. तो वनडे क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतके झळकवणारा एकमेव फलंदाज आहेत. त्याने श्रीलंकेविरुद्ध वनडे क्रिकेटची सर्वोत्तम 264 धावांची खेळी केली होती. त्याने आतापर्यंत 233 वनडे सामन्यांत 9376 धावा केल्या आहेत. यात एकूण 29 शतकांचा समावेश आहे.
Web Title: Rohit Sharma return to the team these cricketers places are in jeopardy shubman gill ishan kishan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.