Rohit Sharma, IPL 2022 : एवढंच आहे तर तुमच्या शहरात ३-४ स्टेडियम तयार करा!; रोहित शर्माने घेतला अन्य फ्रँचायझींशी पंगा, Video 

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाच्या साखळी फेरीतील सामने महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई व पुणे या तीन शहरांमध्ये खेळवण्यात येत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 08:30 PM2022-03-27T20:30:06+5:302022-03-27T20:30:43+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma said, "many franchises objected that how can Mumbai play in Mumbai. They should try to build 3-4 Stadiums in their cities then (smiles)" | Rohit Sharma, IPL 2022 : एवढंच आहे तर तुमच्या शहरात ३-४ स्टेडियम तयार करा!; रोहित शर्माने घेतला अन्य फ्रँचायझींशी पंगा, Video 

Rohit Sharma, IPL 2022 : एवढंच आहे तर तुमच्या शहरात ३-४ स्टेडियम तयार करा!; रोहित शर्माने घेतला अन्य फ्रँचायझींशी पंगा, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाच्या साखळी फेरीतील सामने महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई व पुणे या तीन शहरांमध्ये खेळवण्यात येत आहेत. BCCIच्या या निर्णयावर काही फ्रँचायझींनी नाराजी व्यक्त केली होती. हा निर्णय मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) हिताचा असल्याचा आरोप काही फ्रँचायझींनी केला. त्यामुळेच बीसीसीआयने MI चे केवळ चारच सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ठेवले आहेत. पण, उर्वरित ९ फ्रँचायझींना त्यांच्या घरच्या मैदानावर एकही सामना खेळता येणार नाही.  

आयपीएलचा पहिला सामना खेळण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने या विषयावर त्याचे मत मांडले.  तो म्हणाला, ''आम्हाला घरच्या मैदानाचा कोणताची फायदा मिळणारा नाही, मागील दोन वर्षांपासून आम्ही मुंबईत एकही सामना खेळलेलो नाही. मागच्या वर्षी अन्य संघांना मुंबईत खेळता आले होते. त्यामुळे आम्हालाच फायदा होईल, असं काही नाही. आमचा संघ पूर्णपणे नवा आहे आणि संघातील ७०-८० टक्के खेळाडू यापूर्वी मुंबईत खेळलेले नाहीत.''  

रोहितने फॅन्ससोबत संवाद साधला आणि त्यातही त्याला हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रोहितने मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला, ''अनेक फ्रँचायधी म्हणत होते की मुंबई इंडियन्सला मुंबईत खेळण्याची परवानगी देऊ नका.. त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्ही तुमच्या शहरात ३-४ स्टेडियम्स तयार करा.'' अर्थात रोहितने हे सर्व गमतीने म्हटले.  

पाहा व्हिडीओ...


 

दरम्यान, 

मुंबई इंडियन्सच्या संघाला पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पराभवाचा जबर धक्का दिला. १४व्या षटकापर्यंत मुंबईच्या हातात असलेला सामना तळाच्या अक्षर पटेल ललित यादव जोडीने तोंडचा पळवून नेला. मुंबई इंडियन्स इशान किशनच्या नाबाद ८१ धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकात ५ बाद १७७ पर्यंत मजल मारली होती. हे आव्हान दिल्लीच्या संघाने १० चेंडू राखून आणि चार गडी राखून पूर्ण केलं.

Web Title: Rohit Sharma said, "many franchises objected that how can Mumbai play in Mumbai. They should try to build 3-4 Stadiums in their cities then (smiles)"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.