Asia Cup 2022: "वर्ल्डकपसाठी संघ जाहीर होईपर्यंत आणखी खेळाडूंना आजमावू", रोहित शर्माचं मोठं विधान

आशिया चषकात भारतीय संघाला दुसरा पराभव पत्करावा लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 12:40 PM2022-09-07T12:40:27+5:302022-09-07T12:41:22+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma said that he will give more players a chance until the squad is announced for the T20 World Cup | Asia Cup 2022: "वर्ल्डकपसाठी संघ जाहीर होईपर्यंत आणखी खेळाडूंना आजमावू", रोहित शर्माचं मोठं विधान

Asia Cup 2022: "वर्ल्डकपसाठी संघ जाहीर होईपर्यंत आणखी खेळाडूंना आजमावू", रोहित शर्माचं मोठं विधान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आशिया चषकात (Asia Cup 2022) भारतीय संघाला दुसरा पराभव पत्करावा लागला आहे. मंगळवारी झालेल्या श्रीलंका विरूद्ध भारत (IND vs SL) या सामन्यात यजमान संघाने 6 गडी राखून शानदार विजय मिळवला. सलग दुसऱ्या पराभवामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे. कारण भारताला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी इतर संघावर अवलंबून राहावे लागणार आहे. आशिया चषकाची स्पर्धा मुख्य टप्प्यात येऊन पोहचली आहे. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या 4 संघांनी सुपर-4 मध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघावर विविध स्तरातून टीका होत असतानाच कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) एक मोठे विधान केले आहे.

आशिया चषकाची स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघांविरूद्ध मालिका खेळणार आहे. या मालिका पार पडताच ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे आगामी मोठ्या स्पर्धांपूर्वी भारतीय संघात असलेल्या कमीवर सर्वजण प्रश्न उपस्थित करत आहेत. अशा परिस्थितीत संघाचा कर्णधार रोहित शर्माने संघात काही बदल करणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच सध्याच्या संघाचे देखील विशेष कौतुक केले आहे.

रोहित शर्माचे मोठे विधान 
दरम्यान, आम्ही ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका मालिकेत टी-20 विश्वचषक संघाची घोषणा होईपर्यंत आणखी खेळाडूंना आजमावू, असे रोहित शर्माने म्हटले आहे. तसेच सध्याचा संघ टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी 95% तयार आहे आणि यामध्ये नंतर काही बदल केले जातील असे देखील कर्णधार रोहितने म्हटले. 

श्रीलंकेने भारतावर मिळवला विजय
श्रीलंकेचा खेळ दिवसेंदिवस बहरत चालला आहे. आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यातील पराभवानंतर श्रीलंकेने दमदार पुनरागमन केले. सुपर-4 च्या कालच्या सामन्यात त्यांनी जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतालाच बाहेर केले. भारताने विजयासाठी ठेवलेले 174 धावांचे लक्ष्य श्रीलंकेने 6 गडी व 1 चेंडू राखून रोमहर्षक रित्या पार केले. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून कुसल मेंडिस ( 57) व पथूम निसंका (52) यांनी श्रीलंकेला दमदार सुरूवात करून दिली. त्यांनी पहिल्या बळीसाठी 97 धावांची भागीदारी नोंदवली. त्यानंतर दासून शनाका व भानुका राजपक्षा यांनी 34 चेंडूंत नाबाद 64 धावा करून 6 गडी राखून विजय मिळवला. शनाका 18 चेंडूंत 33 धावांवर, तर राजपक्षा 25 धावांवर नाबाद राहिला.
 

Web Title: Rohit Sharma said that he will give more players a chance until the squad is announced for the T20 World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.