रोहित शर्मा म्हणतो 'या क्लबची मजाच वेगळी'; इशान किशननेही दिला भन्नाट रिप्लाय!

इशान किशन हा रोहित शर्माच्या फेव्हरिट खेळाडूंपैकी एक मानला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 12:58 PM2022-12-12T12:58:35+5:302022-12-12T13:07:35+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma Says 'The Fun Of This Club Is Different'; Ishaan Kishan also gave an amazing reaction | रोहित शर्मा म्हणतो 'या क्लबची मजाच वेगळी'; इशान किशननेही दिला भन्नाट रिप्लाय!

रोहित शर्मा म्हणतो 'या क्लबची मजाच वेगळी'; इशान किशननेही दिला भन्नाट रिप्लाय!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचा स्टार फलंदाज इशान किशन सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने झंजावाती द्विशतक ठोकून सर्वांचीच मनं जिंकली. त्याने आपल्या फलंदाजीने बांगलादेश संघाच्या गोलंदाजांचे अक्षरशः कंबरडे मोडले. इशानने द्विशतक झळकावल्यानंतर, अनेक दिग्गज क्रिकेटर्सनी त्याचे कौतुक केले आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मानेहीइशान किशनच्या शतकावर प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित शर्माने इंस्टाग्रामवर इशान किशनचा फोटो पोस्ट करत लिहिले आहे, 'या क्लबची मजा वेगळी आहे. इशान किशन.’

रोहितच्या या पोस्टवर इशानने देखील मजेदार कमेंट केली आहे. 'मजाच मजा आहे', असं इशानने रोहितच्या पोस्टवर कमेंट करत म्हटलं. इशान आणि रोहित शर्मा दोघेही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात. इशान किशन हा रोहित शर्माच्या फेव्हरिट खेळाडूंपैकी एक मानला जातो.


दरम्यान, बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात इशानने 131 चेंडूंचा सामना करत 210 धवांची जबरदस्त खेली केली. आपल्या खेळीत त्याने 24 चौका आणि 10 षटकारही लगावले. इशानने आपल्या सुरुवातीच्या 100 धावा 85 चेंडूत फटकावल्या. तर पुढच्या 100 धावा त्याने केवळ 41 चेंडूतच केल्या. याच वेळी इशानने विश्वविक्रमही केला आहे. आता तो जगातील सर्वात वेगवान द्विशतक करणारा फलंदाज ठरला आहे.

Web Title: Rohit Sharma Says 'The Fun Of This Club Is Different'; Ishaan Kishan also gave an amazing reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.