Join us  

रोहित शर्मा 'निस्वार्थी' कर्णधार; गौतम गंभीरने सांगितला दोघांमधील फरक

भारताने विश्वचषक स्पर्धेत सलग सहा सामने जिंकत विजयी षटकार ठोकला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 11:59 AM

Open in App

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीने विजयाची मालिका कायम राखली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात १०० धावांनी अफलातून विजय मिळवत टीम इंडियाने पुन्हा एकदा विश्वचषक २०२३ चा दावेदार भारतच असल्याचं दाखवून दिलं. विशेष म्हणजे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने एकाकी झुंज देत ८७ धावांची धडाकेबाज खेळी केली. रोहितच्या या फटकेबाजीमुळे टीम इंडियाला ५० षटकांत २२९ धावांपर्यंत मजला मारता आली. त्यामुळे, रोहितचं सर्वत्र कौतुक होत असताना टीम इंडियाचा माजी कर्णधार गौतम गंभीरनेही कर्णधार रोहित शर्मावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

भारताने विश्वचषक स्पर्धेत सलग सहा सामने जिंकत विजयी षटकार ठोकला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडिया गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे स्पर्धेत रोहित शर्माने कर्णधारासह फलंदाज म्हणूनही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. संघाच्या विजयी मालिकेत कर्णधार म्हणूनही रोहितचं मोठं योगदान आहे. त्यामुळेच, गौतम गंभीरने रोहितचं कौतुक करताना करताना 'कर्णधार आणि नेता' यांमधील फरक सांगितला आहे. रोहित हा कर्णधारासारखा न वागता नेत्यासारखा आहे, असे गंभीरने म्हटलंय. 

कर्णधार आणि लीडर (नेता) यांच्यात फरक असतो. भारतीय संघाने अनेक कर्णधार पाहिले आहेत, पण रोहित शर्मा हा लीडर आहे, कारण तो निस्वार्थी आहे. रोहित आत्तापर्यंत ४० ते ५० शतके बनवू शकला असता. मात्र, तो नंबरसाठी कधीच खेळत नाही. निस्वार्थीपणे खेळून तो एक स्टेटमेंट देऊ इच्छितो, असे गौतम गंभीरने म्हटले आहे. गंभीर हा स्पष्ट आणि परखड म्हणून ओळखला जातो. एखाद्याचं कौतुक करताना आणि एखाद्यावर टीका करतानाही तो स्पष्टपणे भूमिका मांडत असतो. त्यामुळेच, रोहितचं कौतुक करताना त्याने कुणावर निशाणा साधला, याचे तर्क लावले जात आहेत. 

दरम्यान, गौतम गंभीरचा निशाणा टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीवर असल्याची चर्चा आता सोशल मीडियातून रंगली आहे. त्यामुळे, गौतमची स्तुतीसुमने काहींनी गंभीरतेने घेतल्याचं दिसून येत आहे.  

टॅग्स :गौतम गंभीररोहित शर्माविराट कोहलीवन डे वर्ल्ड कप