मान गए उस्ताद!; दुखापतीतून सावरण्यासाठी NCA मध्ये गेलेल्या रोहित शर्माची मन जिंकणारी कृती, भारताचे भविष्य उज्ज्वल

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी नेटमध्ये सराव करताना रोहित शर्माला ( Rohit Sharma) दुखापत झाली अन् त्याला आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 06:30 PM2021-12-17T18:30:36+5:302021-12-18T11:21:28+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma sharing his experiences with the U-19 Indian team at NCA, Injured Rohit Sharma and Ravindra Jadeja at NCA to regain fitness | मान गए उस्ताद!; दुखापतीतून सावरण्यासाठी NCA मध्ये गेलेल्या रोहित शर्माची मन जिंकणारी कृती, भारताचे भविष्य उज्ज्वल

मान गए उस्ताद!; दुखापतीतून सावरण्यासाठी NCA मध्ये गेलेल्या रोहित शर्माची मन जिंकणारी कृती, भारताचे भविष्य उज्ज्वल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी नेटमध्ये सराव करताना रोहित शर्माला ( Rohit Sharma) दुखापत झाली अन् त्याला आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली. आफ्रिका दौऱ्यावर रोहितची उणीव प्रकर्षानं जाणवेल, असे प्रांजळ मत कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली यानं व्यक्त केलं. त्याचवेळी विराटनं अष्टपैलू रवींद्र जडेजा याचं संघासोबत नसणे हा खूप मोठा फटका असल्याचेही कबुल केलं. रोहितसह रवींद्र जडेजालाही दुखापतीमुळे या दौऱ्यावर जाता येत नाही. ही दोघं आता दुखापतीतून सावरण्यासाठी बंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) दाखल झाली आहेत. 

व्ही व्ही एस लक्ष्मण याच्या देखरेखीखाली रोहित व जडेजा तंदुरूस्त होण्यासाठी मेहनत घेत आहेत. पण, त्याचवेळी NCAतील रोहितच्या एका कृतीमुळे सर्वांच्या मनात घर केलं आहे. भारताचा १९ वर्षांखालील युवा संघही NCAत आहे आणि आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी ते तिथे तयारी करत आहेत. रोहित शर्मानं या सर्व खेळाडूंशी NCA सवांद साधला आणि त्यांना त्याच्या अनुभवातून काही अमुल्य मार्गदर्शन केलं. 


आशिया स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान, कुवेत आणि यूएईचे सहभागी होतील. यश धुल आशिया स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्त्व करेल. २३ डिसेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होईल. २५ डिसेंबरला भारत-पाकिस्तानचे संघ आमनेसामने उभे ठाकतील. त्यानंतर २७ डिसेंबरला भारतासमोर अफगाणिस्तानचं आव्हान असेल. स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना ३० डिसेंबरला होईल. १ जानेवारीला अंतिम सामना खेळवण्यात येईल. 

आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ- हरनूर सिंह पन्नू, अंगक्रिश रघुवंशी, अंश गोसाई, एसके रशीद, यश धुल (कर्णधार), अनेश्वर गौतम, सिद्धार्थ यादव, कौशल तांबे, निशांत सिंधू, दिनेश बाना (यष्टीरक्षक), आराध्या यादव (यष्टीरक्षक), राजंगद बावा, राजवर्धन हैंगरगेकर, गर्व सांगवान, रवी कुमार, रिशिथ रेड्डी, मानव पारख, अमृत राज उपाध्याय, विक्की ओस्तवाल, वासू वत्स 

Web Title: Rohit Sharma sharing his experiences with the U-19 Indian team at NCA, Injured Rohit Sharma and Ravindra Jadeja at NCA to regain fitness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.