Rohit Sharma, IND vs SL : "रोहित शर्माने कॅप्टन्सीच्या नादात..."; भारताच्या माजी क्रिकेटपटूने मांडलं सडेतोड मत

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेला ३-०ने केलं पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 06:56 PM2022-02-28T18:56:38+5:302022-02-28T18:58:21+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma should not lose focus on Batting while captaining Team India says EX Indian Cricketer Saba Karim IND vs SL 3rd T20 | Rohit Sharma, IND vs SL : "रोहित शर्माने कॅप्टन्सीच्या नादात..."; भारताच्या माजी क्रिकेटपटूने मांडलं सडेतोड मत

Rohit Sharma, IND vs SL : "रोहित शर्माने कॅप्टन्सीच्या नादात..."; भारताच्या माजी क्रिकेटपटूने मांडलं सडेतोड मत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma, IND vs SL : कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव केला. टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला. कर्णधार रोहित शर्माने या विजयासह मोठा विक्रम केला. पण भारताचा माजी क्रिकेटपटू व माजी निवड समिती सदस्य सबा करीम यांनी रोहितबद्दल एक सूचक विधान केलं. रोहितची कर्णधार म्हणून कारकीर्द उत्तम सुरू झाली असली तरी एका गोष्टीकडे त्याने विशेष लक्ष ठेवायला हवं, असा सल्ला सबा करीम यांनी दिला.

"रोहित त्याच्या फलंदाजीमुळे प्लेइंग ११ मध्ये आहे. त्याच्यासाठी कर्णधारपद ही अतिरिक्त जबाबदारी आहे. अशा स्थितीत रोहितने फलंदाजीवरील आपले लक्ष गमवू नये. कर्णधारपदाच्या दबावाखाली खेळाडू आपले खरे कौशल्य विसरतात असं अनेकदा दिसून आलंय. रोहित शर्मासाठी हा कर्णधारपदाचा फक्त प्रारंभिक टप्पा आहे. संघासाठी त्याच्या धावा किती महत्त्वाच्या आहेत हे त्याला हळूहळू कळेल. विश्वचषकात रोहित शर्माची कामगिरी खूप महत्त्वाची असणार आहे. जिथे मैदान मोठी असतील आणि विरोधी संघांकडे सर्वोत्तम गोलंदाज असतील, अशा परिस्थितीत रोहित शर्माने फलंदाजीवरील लक्ष कायम ठेवायला हवे", असं सबा करीम पॉडकास्टमध्ये म्हणाले.

शेवटच्या दोन सामन्यांत रोहित फलंदाज म्हणून ठरला अपयशी - श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत रोहित शर्मा खास कामगिरी करू शकला नाही. रोहितने पहिल्या सामन्यात ४४ धावा केल्या होत्या. उरलेल्या दोन सामन्यात मात्र त्याने १ आणि ५ धावा केल्या.

Web Title: Rohit Sharma should not lose focus on Batting while captaining Team India says EX Indian Cricketer Saba Karim IND vs SL 3rd T20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.