Venkatesh Iyer catch, IND vs SL 1st T20 Live Updates : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने दुसऱ्या टी२० सामन्यात टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या फलंदाजांनी संयमी सुरूवात केली. पण त्यानंतर मात्र लंकेच्या सलामीवीरांनी दमदार फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. नवव्या षटकात तर गुणतिलकाने आपला रूद्रावतार दाखवून दिला. रविंद्र जाडेजा गोलंदाजीला येताच त्याने पहिल्या तीन चेंडूत दोन षटकार आणि एक चौकार लगावले. पण चौथ्या चेंडूवर मात्र व्यंकटेश अय्यरने त्याचा उत्कृष्ट झेल घेतला.
रविंद्र जाडेजा गोलंदाजीसाठी आल्यानंतर गुणतिलकाने पहिल्या चेंडूवर षटकार लगावला. दुसऱ्या चेंडूवर लगेच चौकार लगावला. तर तिसऱ्या चेंडूवर पुन्हा षटकार लगावला. हा प्रकार पाहून कर्णधार रोहित शर्मा स्वत: जाडेजाच्या जवळ आला आणि त्याला एक सल्ला दिला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर जाडेजाने रोहितच्या सल्ल्यानुसार गोलंदाजी केली आणि गुणतिलकाचा फटका चुकला. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, व्यंकटेश अय्यरने अतिशय त्याचा अप्रतिम असा झेल टिपला. चेंडू हवेत खूप उंच गेला. तरीही नीट लक्ष ठेवून हवेत झेप घेत त्याने तो कॅच घेतला. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, व्यंकटेश अय्यरने तो झेल टिपल्यानंतर श्रीलंकेचा डाव थोडासा संथ झाला. आठव्या षटकात बिनबाद ६७ धावांवर असलेल्या लंकेला १५व्या षटकापर्यंत ४ बाद १०४ धावांपर्यंतच मजल मारता आली.