Rohit Sharma Kieron Pollard, IPL 2022 MI vs LSG Live: मुंबई इंडियन्सचं घरचं मैदान असलेल्या मुंबईच्या वानखेडे मैदानावर तब्बल हजार दिवसांपेक्षाही जास्त दिवसानंतर खेळाडू सामना खेळत आहेत. IPLचे आपले पहिले सात सामने गमावल्यानंतर आठव्या सामन्यात मुंबईला आवडत्या मैदानात सामना खेळायची संधी मिळाली. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी घेतली. सामन्यात लखनौचा सलामीवीर क्विंटन डी कॉक लवकर बाद झाला. पण दुसऱ्या विकेटची भागीदारी तोडण्यासाठी रोहितचा मास्टरप्लॅनच कामी आला.
डी कॉक बाद झाल्यानंतर मनिष पांडे आणि लोकेश राहुल यांच्यात चांगली भागीदारी झाली. राहुलने दमदार फलंदाजी करत गोलंदाजांवर आक्रमण सुरू केलं. १०व्या षटकात लखनौना १७ धावा कुटल्या. त्यामुळे रोहितने ११वे षटक जसप्रीत बुमराहला टाकायला दिले. ते षटक दोघांनी शांतपणे खेळून काढलं. त्यानंतर रोहितने स्मार्ट डाव खेळला. त्याने किरॉन पोलार्डला गोलंदाजी दिली आणि त्याच्या पहिल्याच षटकात त्याने विकेट घेत वाढत जाणारी भागीदारी तोडली. पाहा विकेट-
मनिष पांडेने फारशी चांगली फलंदाजी केली नाही. २२ चेंडून २२ धावांची संथ फलंदाजी त्याने केली. पण त्याने लोकेश राहुलला मात्र चांगली साथ दिली. राहुलने तुफान फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. या जोडीने ४८ चेंडूत ५८ धावांची भागीदारी केली होती.