Join us

रोहित शर्माच्या मुलाचं नाव कळलं का? खुद्द पत्नी रितिकानेच दिली माहिती, जाणून घ्या नावाचा अर्थ

Rohit Sharma son name revealed : पत्नी रितिकाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरी मध्ये ठेवलेल्या फोटोत दिसलं मुलाचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 00:23 IST

Open in App

Rohit Sharma son name revealed : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांनी १५ नोव्हेंबरला दुसऱ्या बाळाचे कुटुंबात स्वागत केले. २०१८ मध्ये रितिकाने लेक समायराला जन्म दिला होता. त्यानंतर ६ वर्षांनी ही जोडी दुसऱ्यांदा आई-बाबा झाली. या दोघांनी अधिकृतरित्या इन्स्टाग्राम पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली. रितिकानं बेबी बॉयला जन्म दिल्यानंतर त्याचे नाव काय असेल, याबाबत सर्वत्र चर्चा सुरु होत्या. अखेर आज रितिकाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीतून मुलाच्या नावाची माहिती दिली.

रोहित-रितिकाच्या मुलाचं नाव काय?

भारतीय क्रिकेटपटू आपल्या मुलांची नावं सनातन धर्माशी संबंधित ठेवत असल्याचा ट्रेंड दिसून येत आहे. विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहनंतर या यादीत आता रोहित शर्माही समाविष्ट झाला आहे. रोहित शर्माने १५ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या आपल्या मुलाचे नाव 'अहान' (Ahaan) असे ठेवले आहे. अहान म्हणजे संस्कृतमधील अर्थ 'खूप शक्तिशाली' असा आहे. यापूर्वी विराट कोहलीने आपल्या मुलाचे नाव भगवान शिवाच्या नावावर 'अकाय' ठेवले होते, तर जसप्रीत बुमराहच्या मुलाचे नाव 'अंगद' असे आहे, जो रामायणातील एक महत्त्वाचे पात्र होता.

अहान म्हणजे काय?

अहान हे नाव भगवान विष्णूशी संबंधित मानले जाते. अहान हे अनेक अर्थ असलेले हिंदू नाव आहे. अहान हे नाव संस्कृत शब्द 'अहा' पासून आले आहे, ज्याचा अर्थ 'जागृत करणे' असा होतो. हे एक शक्तिशाली नाव आहे, जे सूचित करते की या नावाचा व्यक्ती नेहमी सभोवतालच्या जगाबद्दल जागरूक असेल आणि नेहमी शिकण्याचा, वृद्धिंगत होण्याचा प्रयत्न करेल. याशिवाय पहाट, सूर्योदय, सकाळचे तेज, प्रकाशाचा पहिला किरण, चैतन्य, जागृती असेही अहान शब्दाचे अनेक समानार्थी शब्द आहेत.

टॅग्स :रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघइन्स्टाग्राम