आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळणारा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची खास मुलाखत सध्या चर्चेत आहे. एका बाजूला बीसीसीआय अधिकाऱ्यांची टीम इंडियाच्या भविष्यातील संघ बांधणी संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक स्थगित झाली असताना दुसऱ्या बाजूला खास मुलाखतीत रोहित शर्मानं मोठं वक्तव्य केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहितची मुलाखत चर्चेत
मुंबई इंडियन्स फ्रँचायझी संघानं आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन रोहित शर्माच्या खास मुलाखतीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात रोहित शर्मानं आयसीसीच्या मागील तीन स्पर्धेतील संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर भाष्य करताना संघाच्या यशस्वी प्रवासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या खेळाडूंसंदर्भात मोठी गोष्ट बोलून दाखवली आहे. एवढेच नाही तर भारतीय संघाच्या यशाच्या प्रवासातील खास गोष्टीही शेअर केल्या आहेत.
BCCI Central Contract : ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट होणार? जाणून घ्या त्यामागचं कारण
जर वनडे वर्ल्ड कप फायनल जिंकलो असतो तर...
भारतीय कर्णधाराने आपल्या कारकिर्दीतील कामगिरीबद्दल म्हणाला की, आयसीसीच्या मागील तीन स्पर्धेत संघाची कामगिरी बघा. आम्ही फक्त एक सामना गमावला. तोही फायनल (वनडे वर्ल्ड कप २०२३). जर तो सामना आम्ही जिंकलो असतो तर तीन आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा क्षण अधिक खास ठरला असता. २४ सामन्यात २३ विजय कुणी मिळवले आहेत असं ऐकलेले नाही. बाहेरून ही कामगिरी खूप भारी वाटते. पण हे साध्य करताना संघाने चढ-उताराचा सामना केला आहे, असेही रोहितनं सांगितले.
टीम इंडियाच्या यशस्वी प्रवासामागची खास स्टोरी
रोहित शर्मा पुढे म्हणाला, २०२२ मधील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर संघात मोठा बदल झाला. या पराभवानंतर प्रत्येक खेळाडूसोबत चर्चा केली. त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षेसह मानसिक दृष्टिकोन बदलण्यावर काम केले. खेळाडूंना बिनधास्त खेळण्याची मोकळीक देण्यात आली. काही मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला पण न घाबरता प्रकिया पुढेही कायम ठेवली. हाच यशाचा मंत्र होता, असेही तो म्हणाला आहे.
आयसीसी स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूंबद्दलही व्यक्त केली भावना
खास मुलाखतीमध्ये रोहित असही म्हणालाय की, त्याच्या नेतृत्वाखालील संघानं कठीण काळाचा सामना केल्यावर चाहत्यांना आनंदी क्षण अनुभवण्याची संधी दिलीये. आयसीसीच्या तिन्ही स्पर्धेत खेळणारे खेळाडू हे सन्मानास पात्र आहेत. कठीण काळात खेळाडू निराश होतो. त्याला पुन्हा लढायचं असते. यासाठी तो सर्वोत्परी प्रयत्न करतो, या वाक्यावरही त्याने जोर दिला.